कब -बुलबुल जिल्हा मेळाव्यात जि.प.पू.प्रा.शाळा उभादांडा नवाबाग शाळेचे सुयश

वेंगुर्ले । प्रतिनिधी : बॅ.नाथ पै.सेन्ट्रल स्कूल कुडाळ ता.कुडाळ येथे दि.६व ७ फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय कब-बुलबुल मेळाव्यात जि.प.शाळा उभादांडा नवाबाग ता.वेंगुर्ला शाळेला उत्तम यश मिळाले. जंगी आरोळी स्पर्धेत द्वितीय क्रमांक व दोरीच्या गाठी मारणे यातही द्वीतीय क्रमांक प्राप्त झाला.या मेळाव्यात स्काऊट झेंडावंदन,मातकाम,कबग्रीटींग,दोरीच्या गाठी मारणे,शोभायात्रा,शेकोटी कार्यक्रम,सर्वधर्मीय प्रार्थना,स्वच्छता इ.विविधरंगी कार्यक्रम घेण्यात आले.मुलांनी अगदी समरसतेने सर्व कार्यक्रमाचा आनंद लूटला.

सर्व कार्यक्रमासाठी मुलांना मुख्याध्यापिका श्रीम.प्राजक्ता आपटे,कब मास्तर श्री.रामा पोळजी,शिक्षक श्री.मारुती गुडूळकर,श्रीम.सोनाली नागवेकर,शाळा व्य.स.अध्यक्ष श्री.दादा केळूसकर,उपाध्यक्ष श्री.दत्ताराम कोळंबकर,पालक श्री.लक्ष्मण केळुसकर यांचे मार्गदर्शन लाभले. या मेळाव्याला अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून मुलांचे अभिनंदन व कौतुक केले.