रत्नागिरी जिल्ह्याचे नाव रोशन
शंकर वैद्य | साखरपा
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथील तन्वी उदय कोलते हिने Bigg Boss मराठी सिझन 6 या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये दमदार विजेतेपद मिळवत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या आत्मविश्वासपूर्ण खेळीमुळे आणि स्पष्टवक्ते पणामुळे ती अल्पावधीतच घराघरात पोहोचली आहे.
तन्वीच्या वाढत्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर तीचा भाऊ चिन्मय याने माध्यमांशी संवाद साधत सर्व चाहत्यांचे आभार मानले.
तन्वीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो. तुमच्या पाठिंब्यामुळेच ती आज इथपर्यंत पोहोचली आहे, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर, पुढील काळातही तन्वीला असाच भरभरून पाठिंबा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करत कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला. तन्वीच्या या यशामुळे तिच्या कुटुंबात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिच्या यशाचे श्रेय आपण सर्व चाहते आणि त्याची कठोर मेहनत असल्याचे सांगितले. तसेच भाऊ म्हणून मला तिचा गर्व असल्याचे सांगायला तो विसरला नाही. तन्वीच्या या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.











