रत्नागिरी : पक्षाचे झेंडे लावले म्हणून भाजपाच्या महिला पदाधिकारी यांना दमदाटी करणाऱ्या दोघांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
वरून झालेल्या दमदाटी विरोधात मा.जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे कडे तक्रार अर्ज दिला.
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा सौ.प्रियल प्रशांत जोशी यांच्या घरी दि.३०/०१/२०२४ रोजी माजी आमदार बाळासाहेब माने यांचे अध्यक्षतेखाली बूथ क्लस्टर बैठक होती. त्यासाठी येणाऱ्या मार्गावर भाजपा झेंडे लावण्यात आले होते. राष्ट्रीय महिला कार्यकारिणी सदस्या सौ.अर्चनाताई देसाई, महिला प्रदेश महामंत्री सौ. मंजुषा कुद्रिमोती, प्रदेश महिला सचिव सौ. शिल्पा मराठे, जिल्हाध्यक्षा सौ. सुजाता साळवी यांचे सूचने नुसार भाजपा झेंडे लावले होते.
त्यावेळी हे झेंडे का लावण्यात आले ह्याचा जाब दि.३१/०१/२०२४ रोजी रोहन शिंदे, विनोद झाडगांवकर यांनी विचारला व त्यावेळी सौ.जोशी यांचे सोबत गैरवर्तन करण्यात येऊन अर्वाच्य शिवीगाळ करण्यात आली असे पोलिसांना देण्यात आलेल्या तक्रार अर्जात नमूद करण्यात आले. महिलांशी व त्यातही महिला पदाधिकारी असूनही त्यांचे सोबतचे हे कृत्य अत्यंत निंदनीय होते. याबाबत माजी खासदार निलेश राणे यानाही या घटनेची माहिती देण्यात आली .या दहशतीची दखलही राष्ट्रीय व प्रदेश महिला पदाधिकारी यांनी त्वरित घेतली व रत्नागिरी दौऱ्यात सौ.प्रियल जोशी यांचे घरी भेट दिली व धीर दिला.
तक्रार अर्ज देताना भाजपा जिल्ह्याध्यक्ष राजेश सावंत,सरचिटणीस सतेज नलावडे,युवा प्रदेश सचिव विक्रम जैन,महिला जिल्हा सरचिटणीस सौ.वर्षा ढेकणे,सौ रायकर,तालुका सरचिटणीस ओंकार फडके,दादा ढेकणे,बाबू सुर्वे,संकेत कदम इत्यादी उपस्थित होते.










