सूर्यनारायण श्रीगणेशासमोर झाले नतमस्तक!

पहा कुठे घडला हा चमत्कार

रत्नागिरी : कोल्हापूर येथील आंबाबाई देवीचे चरणस्पर्श करणाऱ्या भास्कराबद्दल अनेकांनी ऐकले असेल तसाच चमत्कार म्हणूया किंवा भौगोलिक घटना म्हणूया पण रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील प्रसिद्ध श्री गणेशाच्या चरणी नतमस्तक होणाऱ्या सूर्यनारायणाचे अद्भुत दृश्य आज पाहायला मिळाले.

अस्ताला जाता जाता गणरायाच्या चरणी श्री भगवान सूर्य नारायण आज श्रीचे चरणी नतमस्तक झाले. वर्षातून दोन वेळा अशी भौगोलिक आणि भाविकासाठी चमत्कारीक घटना घडते.