फोंडाघाट | कुमार नाडकर्णी : कोरगावकरवाडी, फोंडाघाट येथे गणेश मित्र मंडळ आयोजित माघी गणेश जयंती उत्सव २०२४ चे निमित्ताने सकाळी गणेश मूर्ती अभिषेक,दुपारी बारा वाजता गणेश जन्म व महाआरती आणि महाप्रसाद,सायंकाळी महिलांकरता हळदीकुंकू आणि रात्री स्थानिक भजने असा कार्यक्रम होणार आहे.
गडगेसकल- गोसावी वाडी
येथे गणेश मंदिरात सकाळी पुजाअर्च्या, अभिषेक, दुपारी बारा वाजता महाआरती- महाप्रसाद, सायंकाळी महिलांसाठी हळदीकुंकू आणि कीर्तन त्यानंतर स्थानिक भजने व रात्री भवानी नाट्य मंडळाचा आप्पा दळवी कृत दशावतारी नाट्य प्रयोग होणार आहे.
हरकुळ – खुर्द, थडेवाडी
सलग २१ व्या वर्षी गणेश मित्र मंडळ हरकुल खुर्द, थडेवाडी येथील श्री गणेश गगनगिरी मंदिर येथे माघी गणेश जयंती उत्सव साजरा होणार आहे. सकाळी गणेश मूर्ती अभिषेक व पूजाअर्च्या व प.पु.स्वामी गगनगिरी महाराज यांचे पादुका पूजन, ह.भ.प जयवंत पाटील महाराज- राधानगरी यांचे कीर्तन, दुपारी बारा वाजता गणेश जन्म सोहळा,महाआरती व महाप्रसाद, त्यानंतर लिंगेश्वर प्रा.भजन मंडळ, जाणवली. नवलाई देवी भजन मंडळ-केळवली.मेजारेश्वर प्रसा. भजन मंडळ, नागवे.विठ्ठल रखुमाई प्रा.दिंडी भजन मंडळ, आचरा यांची प्रसिद्ध भजने होणार आहेत.बुधवार तारीख १४ फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ सिंधुदुर्ग यांचा महान पौराणिक “सहस्र नागबळी अर्थात अघोरी शंकर” होणार आहे.
राधाकृष्ण मंदिर फोंडाघाट श्री देव राधाकृष्ण मंदिर, बाजारपेठ येथे माघी गणेश जयंती निमित्त गणेश जन्मोत्सव बाळ गोपाळ मंडळातर्फे साजरा होणार आहे.सोमवार तारीख १२ रोजी सायंकाळी सहा वाजता कीर्तन. आणि मंगळवार तारीख १३ रोजी सकाळी पूजाअर्चा,कीर्तन,दुपारी बारा वाजता गणेश जन्मोत्सव, महाआरती व महाप्रसाद. सायंकाळी हरिपाठ आणि स्थानिक मंडळांची भजने होणार आहेत.
वरील सर्व सोहळ्याचा पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संबंधित मंडळाच्या संचालकांनी केले आहे…












