खेड(प्रतिनिधी)
कोकण रेल्वे मार्गावरील कोकणकन्या एक्सप्रेसमध्ये पनवेल ते दिवाणखवटी दरम्यान प्रवास करताना अज्ञात चोरट्याने खिशातील महागड्या मोबाईलची चोरी केल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी एकनाथ चंद्रकांत सावरटकर हे पनवेल ते दिवाणखवटी कोकण कन्या एक्स्प्रेसच्या गाडीच्या इंजिनच्या मागील दुसऱ्या जनरल डब्यातून गाडीला गर्दी असल्याने उभ्याने प्रवास करत होते. त्यांच्या पँटच्या उजव्या खिशात असलेला सॅमसंग कंपनीचा ३० हजार रुपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन लबाडीने चोरुन नेला म्हणून अज्ञात चोरट्याविरुद्ध खेड पोलिसात भा. द. वि. सं. क. ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










