संतोष कुळे l चिपळूण :मालवाडी राधाकृष्ण मंडळ पन्हाळजे खेड यांच्या वतीने गुरु बाबासाहेब आजरेकर फड, श्री क्षेत्र पंढरपूर व श्री गुरु ह भ प श्री भाऊ बोराटे यांच्या अधिपत्याखाली मंगळवार दिनांक 20 ते 21 फेब्रुवारी पर्यंत जया एकादशी महोत्सव व अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध कार्यक्रमाचे होणार आहेत.
दरवर्षी जया एकादशीला विविध कार्यक्रम आयोजित करून मालवाडी राधाकृष्ण मंडळ भाविकांची सेवा करत असते. मंगळवार दिनांक २० रोजी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी महाअभिषेक व महापूजा, सकाळी ७.४० कळस पूजन, सकाळी १० वाजता श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी समूह पारायण, दुपारी १२.३० वाजता मालवाडी राधा कृष्ण महिला मंडळातर्फे हळदीकुंकू समारंभ, दुपारी ३ वाजता राधाकृष्ण पालखी मिरवणूक, सायंकाळी ४.३० वाजता ह भ प दीपक साळवी पेवे गुहागर यांचे प्रवचन, सायंकाळी ६ ते ७ वाजता हरिपाठ, रात्री ७ ते ९ वाजता हभप गणेश महाराज शिगवण हरी किर्तन, रात्री ९ ते १० वाजता दिंड्यांचे सामूहिक भजन व सत्कार समारंभ, रात्री १०.३० वाजता नव विकास नमन मंडळ आबीटगाव दत्तवाडी यांचे बहुरंगी नमन सादर होईल.
त्यानंतर बुधवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजता काकड आरती व महाअभिषेक, सकाळी ८.३० ते ९.३० वाजता ग्रंथराज ज्ञानेश्वरी समूह पारायण, सकाळी १० ते दुपारी १२ वाजता हभप दीपक बुवा साळवी गुहागर यांचे काल्याचे किर्तन, दुपारी १२ ते १ वाजता महादिंडी व मंदिर प्रदक्षिणा, दुपारी १ वाजता महाप्रसाद होईल. असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला सर्व भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मालवाडी राधाकृष्ण मंडळ व महिला मंडळ पन्हाळजे यांनी केले आहे.











