फुणगूस कडेवठार येथे माघी गणेशोत्सवाला सुरुवात

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस कडेवठार येथे आजपासून माघी गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. दि. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता पुण्याहवाचन षोडशोपचार पूजा, सायंकाळी ६ वाजता कीर्तन, रात्री ९ वाजता आरती व भोवत्या पार पडल्या.
 दि. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता पूजा व सहस्त्रावर्तन सायंकाळी ६ वाजता गणेश जन्माचे कीर्तन, रात्री ८ वाजता प्रसाद (खिचडी), आरती व भोवत्या, दि.१४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता श्री सिद्धिविनायक पूजा, सकाळी ११ वाजता लळीताचे कीर्तन, दुपारी १२.३० वाजता आरती आणि महाप्रसाद रात्री ९ वाजता आरती व भोवत्या, १५ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम व विनोदी लोकनाट्य या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन फुणगूस कडेवठार ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.