४२ वर्षापासून प्रलंबित बोरघर पुनर्वसन प्रश्न आ. योगेश कदम यांनी सोडवला

खेड(प्रतिनिधी) आमदार योगेश कदम यांच्या समवेत तहसीलदार खेड यांच्या दालनात  पुनर्वसन वसाहत बोरघर व आदिवासी वसाहत यांची पुनर्वसन बाबत आढावा बैठक नुकतीसंपन्न झाली या बैठकीत तब्बल ४२ वर्ष प्रलंबितअसलेला  प्रश्न आमदार योगेश कदम यांनी सोडवला.
या बैठकीत बोरघर पुनर्वसना बाबत १८ नागरी सुविधांची पूर्तता करण्याबाबत महसूल विभागामार्फत संबंधित यंत्रणा नगररचनाकार पाटबंधारे विभाग, जि प विभाग पुनर्वसन, व महसूल तसेच भुमिअभिलेख यांनी एकत्र येऊन ४२ वर्षापासून प्रलंबित असलेला पुनर्वसन बाबतचा सोयी सुविधांची पूर्तता करण्या बाबत चा   प्रश्न सोडवण्यात आला
 याप्रसंगी आदिवासी वसाहतीचे पुनर्वसनबाबतचे बोरघर हद्दीतच खाजगी जमीन विकत घेऊन त्या ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करणे बाबत आमदार कदम यांनी महसूल विभागाला सूचना दिल्या याप्रसंगी पाटबंधारे प्रकल्पाचे अधिकारी महसूल विभागाचे अधिकारी तसेच बोरघर पुनर्वसन ग्रामस्थ व आदिवासी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
 यावेळी आमदार योगेश कदम यांचे समवेत तहसीलदार सोनवणे उपाभियंता गोसावी तालुकाप्रमुख सचिन धाडवे आरपीआयचे राज्यकार्य कारिणी सदस्य दादासाहेब मर्चंडे ,शांताराम म्हसकर विजय  बेलोसे, किशोर बोरकर तसेच पुनर्वसन ग्रामस्थ चंद्रमणी रुके, अरुण मोरे, अनिल धोत्रे, मुकुंद मोरे, प्रभाकर धोत्रे, चंद्रकांत धोत्रे, अशोक धोत्रे राजकुमार धोत्रे रोहन धोत्रे चेतन धोत्रे व आदी आदिवासी समाजाचे बाळकृष्ण पवार संजय पवार आकाश पवार निकम आदी ग्रामस्थ उपस्थित होते.