ऱाजापूर | प्रतिनिधी : तालुक्यातील व्हेल माशाच्या तस्करी प्रकरणी संशयीत मुख्य आरोपी अद्यापही फरारच असुन मुद्देमाल देखील मिळविण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यान्ना अपयश आल्याने आता वनविभागाच्या कारभारावरच टिका होवू लागली आहे .
मागील आठवड्यात (४ फेब्रूवारी) रोजी विभागिय वनाधिकारी रत्नागिरी ( चिपळुण ) यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनाधिकारी रत्नागिरी यांच्या मदतीने राजापूर वनविभागाने मिळालेल्या माहितीच्या आधारे व्हेल माशाच्या उलटीची तस्करी रोखण्यासाठी सापळा रचला होता . त्या प्रकरणी चार आरोपीना ताब्यातही घेतले होते .मात्र त्या प्रकरणातील मुख्य संशयीत आरोपी मात्र अद्याप सापडलेला नसुन तो फरारच आहे. तर तस्करीतील मुद्देमालही हस्तगत करण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यान्ना अद्याप यश आलेले नाही ही बाब सुध्दा अधोरेखित ठरली आहे .
तस्करीतील चार आरोपीन्ना अटक होत असताना दुसरीकडे मुद्देमाल न सापडणे यावरुन वनविभागाच्या भुमिकेवर साशंकता व्यक केली जावू लागली आहे मुख्य संशयीत आरोपी आद्याप फरार कसा ?असे खोचक सवाल उपस्थीत होत आहेत .
ज्यावेळी ही तस्करी वनविभागाने रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा यातील आरोपीनी वनविभागाच्या अधिकार्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करत पळुन जाण्यात यश मिळवले होते . त्यानंतर काही आरोपीना गगनबावडा येथुन ताब्यात घेतले असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले होते. संशयीत मुख्यआरोपीसह मुद्देमाल देखील अद्याप सापडलेला नाही त्यामुळे मुद्देमाल सुध्दा फरार असल्याची टिका होत आहे वनविभागावरच आता संशयाच्या सुया फिरु लागल्या आहेत .
जो पाचवा आरोपी फरार असल्याचे वनविभाग सांगत आहे तो स्थानिक असल्याचे वनविभागाने यापुर्वीही स्पष्ट केलेले आहे . तो आरोपी कोण याची वनविभागाच्या अधिकार्याना पुर्ण कल्पना असुन एका लोकप्रतिनिधीच्या हस्तक्षेपामुळे अद्यापही वनविभाग त्या आरोपीपर्यंत पोहचत नसल्याची चर्चा वनविभागाच्या भिंतीआड सुरु असल्याचे दिसुन येते . राजकिय दबावामुळेच या मुख्य आरोपीला मुंबइत जाण्यास अप्रत्यक्षरित्या पाठबळ दिल्याची चर्चाही खुलेआम पणे सुरु आहे











