16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी | प्रतिनिधी : शहरातील गोगटे कॉलेज जवळील पोस्टाच्या गल्लीत सोमवार 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.30 वा. सुमारास दोन गटांत हाणामारीची घटना घडली.याबाबत शहर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार देण्यात आली असून 16 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजिंक्य शिंदे, संतोष शिंदे, त्यांची पत्न्ाी (तिन्ही रा.नाचणे विश्वनगर,रत्नागिरी) ओम नागवेकर, त्याचे वडील, मामा झापडेकर (तिन्ही रा.कर्ला,रत्नागिरी) व इतर दहा जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आल आहे. याबाबत ओम नागवेकरने दिलेल्या तक्रारीनुसार, अजिंक्य शिंदेने त्याच्या मैत्रिणीचा हात धरला होता. याबाबत ओमने त्याला विचारणा केली असता त्याने ही बाब आपल्या आई-वडिलांना सांगितली. तेव्हा त्याचे आई-वडील अजिंक्यला याबाबत विचारणा करण्यासाठी गोगटे कॉलेजजवळ गेले असता अजिंक्यने त्यांना शिवीगाळ करुन हातांच्या थापटांनी मारहाण केली. तसेच अजिंक्य सोबत असलेल्या दोन अज्ञातांनीही या तिघांनाही हातांच्या ठोशांनी मारहाण व धकलाबुकल करुन शिवीगाळ केली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तसेच याबाबत अजिंक्यचे वडिल संतोष शिंदे यांनी दिलेल्या परस्परविरोधी तक्रारीनुसार, ओम नागवेकर आणि अजिंक्य यांच्यात वाद झाले होते. म्हणून संतोष शिंदे या बाबत ओम नागवेकरकडे विचारणा करण्यासाठ गेले असता त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर ओमने संतोष शिंदे याच्या शर्टाला पकडून पोस्टाच्या गल्लीत नेउन कोणत्यातरी लोखंडी वस्त्ाुने त्यांच्या डोक्यात मारहाण केली. त्यानंतर ओम सोबत असलेल्या इतर अज्ञातांनी संतोष शिंदे यांना लाथा बुकक्यांनी मारहाण केली.त्यांची पत्नी हे भांडण सोडवण्यासाठी गेली असता संशयितांनी त्यांनाही धक्काबुक्की करत पुन्हा भेटाल तर मारु अशी धमकी दिली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात भादंवि कायदा कलम 143,147,149,324,323,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








