रत्नागिरी महासंस्कृती महोत्सव २०२४

अवधूत गुप्तेंच्या ‘संगीत रजनी’ ने गुरुवारी सांगता

रत्नागिरी : ‘रत्नागिरी महासंस्कृती महोत्सव-2024’ अंतर्गत उद्या गुरुवार दि. 15 फेब्रुवारी रोजी सांयकाळी 7 वाजता अवधूत गुप्ते यांचा ‘अवधूत गुप्ते संगीत रजनी’ या कार्यक्रमाने याची सांगता होणार आहे.*

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय व रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्यावतीने येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात रविवार दि. 11 फेब्रुवारीपासून ‘रत्नागिरी महासंस्कृती महोत्सव-2024’ ला सुरुवात झाली आहे. याला रत्नागिरीकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या महोत्सवात पारंपरिक कलाप्रकारही स्थानिक कलाकारांकडून सुरुवातीलाच सादर करण्यात येत आहे.

या महोत्सवाला प्रवेश विनामुल्य असून या महोत्सवाची सांगता आज होणार आहे. उद्या गुरुवार दि. 15 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचा आस्वाद रसिक प्रेक्षकांनी घ्यावा.