रत्नागिरी : ‘नमन’ (खेळे) म्हणजे कोकणची लोककला आणि या लोककलेचा जागर करून त्या कलेला शासनाकडून राजाश्रय मिळावा यासाठी या कलेसाठी अविरत झटणारे कलावंत एकवटलेले आहेत. अशा या लोककलेला व्यासपीठ मिळवून देत कलेचा जागर करण्याचा पयत्न रत्नागिरी शहरानजिकच्या मिरजोळे पाडावेवाडी येथे सुरू आहे.
त्याठिकाणी श्री माघी गणेशोत्सव मंडळ पाडावेवाडी आणि कोकण नमन कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय नमन स्पर्धेच्या माध्यमातून रसिकजनांना ही लोककला पाहण्याची मोठी पर्वणी लाभली आहे. या नमन स्पर्धेचा शुभारंभ मंगळवारी मोठ्या थाटात संपन्न झाला. या कार्यकमासाठी उद्योजक रविंद्र उर्प आण्णा सामंत, माजी जि.प.सदस्य महेश उर्प बाबू म्हाप, मिरजोळे ग्रा.पं.सरपंच गजानन गुरव, कोकण नमन कलामंच रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष पी.टी.कांबळे, संस्थापक अध्यक्ष श्रीधर खापरे, ग्रा.पं.सदस्य सौ. पूनम पाडावे तसेच नेताजी पाटील, माघी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुनील कोलगे, उपाध्यक्ष भिकाजी पाडावे, वाडीपमुख दिपक गावकर, पकाश पाडावे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

पाडावेवाडी येथील श्री माघी गणेशोत्सव मंडळ पाडावेवाडी यांच्यावतीने आयोजित ही जिल्हास्तरीय नमन स्पर्धा 17 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. 18 फेब्रुवारी राजी या स्पर्धेंचा बक्षिस वितरण समारंभ होणार आहे. या कालावधीत विविध कार्यकमही होणार आहेत. जिल्हास्तरीय नमन स्पर्धेचे उद्घाटनपसंगी श्री आई भवानी नमन मंडळ निवे बु. देवरुख, व जय भैरी नमन मंडळ, ओरपेवाडी, लाजुळ यांचा नमन कार्यकम मंगळवारी पार पडला. गुरुवार दि. 15 फेब्रुवारी रोजी श्रीराम नमन मंडळ, कामथे हुमनेवाडी, चिपळूण, भैरवनाथ नमन मंडळ रानपाट यांचा नमन कार्यकम होणार आहे. शुकवार दि. 16 फेब्रुवारी रोजी स. 10 वा. रक्तदान व आरोग्य शिबिर, रात्रौ आज्ञेश्वर महालक्ष्मी नमन मंडळ सनगरेवाडी, हातखंबा. व वाघजाई नवतरूण फणसवळे यांचा नमन कार्यकम. शनिवार दि. 17 फेब्रुवारी रोजी जुगाई नमन मंडळ, पानवल., ररवळनाथ रिमिक्स लयभारी नमन मंडळ यांचा नमन कार्यकम. रविवार दि. 18 फेब्रुवारी रोजी स. 11.00 वा. श्री सत्यनारायणाची महापुजा, दु. 1.00 ते 3.00 वा. महाप्रसाद, रात्रौ 9.30 वा. मान्यवरांचे हस्ते नमन स्पर्धेचे बक्षीस वितरण असे कार्यकम होणार आहेत.











