मळगाव ग्रामस्थ आणि भिल्लवाडी ग्रुपतर्फे शिवजयंती उत्सवाचे आयोजन

विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

सावंतवाडी । प्रतिनिधी : हिंदुस्थानचे आराध्य दैवत जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मळगाव ग्रामस्थ आणि भिल्लवाडी ग्रुप मळगाव यांच्यावतीने सोमवार १९ फेब्रुवारी रोजी भव्य सार्वजनिक शिवजयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हा कार्यक्रम होणार आहे.
यावेळी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळणार आहे.
यनिमित्त पहाटे ५ वाजता यशवंत गड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मळगावपर्यंत मशाल रॅली, सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज अभिषेक सोहळा, दुपारी २ ते ४ या वेळेत संपूर्ण गावात मोटरसायकल रॅली व होळकर घर ते छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत ढोल ताशा पथक, सायंकाळी ४ ते ५ वाजता महिला हळदी कुंकू, फुगड्या, पैठणी व संगीत खुर्ची खेळ, सायंकाळी ५ ते ६ वाजता लेझीम नृत्य, वेशभूषा व वक्तृत्व स्पर्धा, सायंकाळी ०६ ते ७ वाजता मर्दानी खेळ व बक्षीस समारंभ, सायंकाळी ०७ वाजता स्नेहभोजन त्यानंतर रात्री ०९ वाजता विश्वकला मंच कलानिमित्त कलाविष्कार, नृत्य, हास्य, विनोदांचा खास आकर्षण आदीकार्यक्रम होणार आहेत.
या कार्यक्रमा निमित्त आयोजित स्पर्धेसाठी आपली नावे पांडुरंग राऊळ- ९९६७३३३१००/९६१९२०२६८७, सचिन राऊळ- ८८९८९०९१००, दिपेश राऊळ-९११२१११९८९, निलेश ठाकूर-९४०४७४८४९३, रितेश राऊळ-८७८८८७६१७३ व आनंदी फोटो स्टुडिओ-९७६३४८८५६० यांच्याशी संपर्क साधून नावनोंदणी करावी तसेच मळगाव येथील सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहून या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मळगाव ग्रामस्थ आणि भिल्लवाडी ग्रुपच्यावतीने करण्यात आले आहे.
Sindhudurg