महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्यावतीने मंडणगड येथे बेरोजगार मार्गदर्शन मेळावा

मंडणगड | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ जिल्हा रत्नागिरी यांच्यावतीने 2 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11.00 ते 2.00 या वेळेत मंडणगड शहरातील कुणबी भवन येथे शेतकरी, व सुशिक्षीत बेरोजगारांचे मेळाव्याचे आयोजन कऱण्यात आले आहे. या मेळाव्या मध केंद्र व मधमाशा पालन या विषयावर तज्ञ मार्गदर्शन करणार आहे. मेळाव्याचे उद्घाटन मंडणगड तालुका औद्योगीक बहुउद्देशीय ग्रामिण सहकारी संस्थेचे अध्यक्ष राकेश साळुंखे यांच्या हस्ते होणारे असून जिल्हा उद्योग केंद्रांच्या महाव्यवस्थाक सौ. विद्या कुलकर्णी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविणार आहेत. जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस.जी. कोलथरकर व लीड बँक मँनेजर मुकंद खांडेकर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमास कृषि पर्यवेक्षक सचिन पवार, नगरसेवक सुभाष सापटे, परिमंडळ वन अधिकारी उदय भागवत यांची उपस्थिती लाभणार आहे.