मसुरे | झुंजार पेडणेकर : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवात मोठ्या गटातील ज्ञानी मी होणार या स्पर्धेमध्ये केंद्रशाळा मसुरे नं.१ च्या विध्यर्थिनी कु. श्रेया प्रदीप मगर व कु. यशश्री गुरुनाथ ताम्हणकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. शालेय अभ्यासक्रम, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी यावर आधारित असणाऱ्या या स्पर्धेत त्यांनी मालवण तालुक्याचे प्रतिनिधित्व करताना घवघवीत यश मिळविले. त्यांना सौ. रामेश्वरी मगर, गोपाळ गावडे, शर्वरी सावंत, गुरुनाथ ताम्हणकर, विनोद सातार्डेकर, उमेश खराबी यांनी मार्गदर्शन केले. विजेतेपदाच्या करंडकासह सुवर्ण पदक, प्रशस्तिपत्र देऊन शिक्षणाधिकारी श्री. महेश धोत्रे, उपशिक्षणाधिकारी श्री. रामचंद्र आंगणे, उपशिक्षणाधिकारी श्री. शोभराज शेर्लेकर, गटशिक्षणाधिकारी श्री. संजय माने, विस्तार अधिकारी सौ. परब, केंद्रप्रमुख श्री. नारायण देशमुख यांनी त्यांचा गौरव केला. यशा बद्दल गुणवंत विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन होत आहे.