छत्रपती शिवरायांचे गुण आत्मसात करा–दत्ता सामंत

 

आचरा l अर्जुन बापर्डेकर :जीवन संस्कारक्षम आणि सुसंस्कृत करण्यासाठी नरकासुराच्या प्रतीमेचे नव्हे तर प्रवृत्तीचे दहन करुन छत्रपतींचे गुण आत्मसात करा.स्वराज घडविण्याची जिद्द निर्माण करणाऱ्या जिजाऊंचा आदर्श घ्या असे आवाहन भाजप नेते दत्ता सामंत यांनी आचरा हिर्लेवाडी येथे केले.

हिर्लेवाडी येथील माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त आयोजित गुणगौरव समारंभात ते बोलत होते.यावेळी त्यांच्या सोबत आचरा सरपंच जेरान फर्नांडिस, माघी गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष लवू मालंडकर,हिर्लेवाडी मंडळाचे अध्यक्ष पांडूरंग वायंगणकर,सोसायटी चेअरमन अवधूत हळदणकर, दिपक पाटकर,उपसरपंच संतोष मिराशी,जयप्रकाश परुळेकर, चावल मुजावर,सिनेअभिनेत्री मौसमी तोंडळकर,,डॉक्टर प्रमोद कोळंबकर, कांबळी,उदय घाडी,अर्जुन बापर्डेकर, किशोर हिर्लेकर,योगेश मुणगेकर,जेष्ठ नागरिक तोंडवळकर,यांसह माघी गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते.यावेळी हिर्लेवाडी माघी गणेशोत्सव मंडळातर्फे मान्यवरांचे शाल श्रीफळ, स्मृती चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. आभार मालंडकर यांनी मानले