कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांची विधानसभेत मागणी
कोकणातील प्रत्येक नगरपंचायत,नगर परिषदांना प्रत्येकी पंचवीस कोटी रुपये नगरोत्थानचा निधी द्या
कुडाळ एमआयडीसीचे रिस्ट्रक्चरिंग करा
आमदार निलेश राणे यांनी मतदार संघातील आणि कोकणातील अनेक प्रश्नांवर सभागृहाचे लक्ष वेधले.
संतोष राऊळ ( मुंबई विधानसभा)
कोकणातील नद्यांमध्ये गाळ काढण्यासाठी सरकारने स्वतंत्र पॅकेज द्यावे अशा पद्धतीची मागणी कुडाळ मालवण चे आमदार नितेश राणे यांनी केली. गाळ भरल्यामुळे नद्या बुजल्या आणि गावच नद्यांमध्ये गेले, अनेक गाव उध्वस्त होण्याची भीती निर्माण झालेली आहे. चिपळूणसारख्या शहरात पाणी घुसले आणि मोठी पूरहानी झाली. या सगळ्या गोष्टींचा विचार करता कोकणाला गाळमुक्त करणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी आपण सरकारने निधी द्यावा. बजेटमध्ये त्याची वेगळी तरतूद करावी अशी आग्रही मागणी आमदार निलेश राणे यांनी सभागृहात मांडली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आमदार निलेश राणे यांनी चर्चेत भाग घेत. मतदार संघ आणि कोकणातील अनेक प्रश्नांवर सभागृहाचे लक्ष वेधले.
काही वर्षांपूर्वी चिपळूण ची वाशिष्टी नदी गाळाने भरली आणि चिपळूण शहर पाण्याखाली गेले हीच स्थिती राजापूरातल्या नदीची सुद्धा काही वर्षांपूर्वी तशीच होती ह्या सगळ्याचा विचार करता कोकणात असे अनेक नद्या आहेत ज्या ठिकाणी कॅमेरे पोहोचत नाहीत या ठिकाणी लोक आज जीव मुठीत घेऊन जगत आहेत या सगळ्यांचा विचार करता गाय करण्यासाठी कोकणाला स्वतंत्र पॅकेज अत्यंत आवश्यक असल्याचेही यावेळी आमदार निलेश राणे म्हणाले. डोंगर सह्याद्री आणि समुद्र यांच्यामध्ये वसलेला कोकण आहे आणि पाऊस ४००० मिलिमीटर पेक्षा जास्त पडतो आणि अशावेळी डोंगरातला गाळ वाहून समुद्रापर्यंत येतो आणि नद्या भरून जातात अशी भौगोलिक स्थितीची आमदार निलेश राणे यांनी यावेळी सभागृहात मांडणी केली.
कोकणातील नगरपंचायती लहान आहेत. लोकसंख्या कमी आहे. असा विचार करून त्यांना नगरांचा निधी कमी दिला जातो. मात्र ती शहरे पर्यटन दृष्ट्या विकसित आहेत. याकडे सरकारने लक्ष द्यावे. मालवण शहराचा विचार करता या शहरात पर्यटन दृष्ट्या फार मोठा राबता आणि त्यामुळे पर्यटकांची गर्दी त्यांची व्यवस्था सुख सोयी निर्माण करून देणे या सर्व गोष्टींना महत्त्व येते. अशा स्थितीत नगरोत्थान चा निधी कोकणातील नगरपंचायत नगर परिषदांना मिळतो तो फारच नगण्य आहे.तो वाढवून 25 कोटी प्रत्येकी मिळावा अशी मागणी कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी विधानसभेत केली.
कुडाळ एमआयडीसी, माझ्या मतदार संघात आहे.सरकार म्हणून आपण त्यांच्यावर काय लक्ष देणार आहोत की नाही ? त्यांच्या रिव्हायवल साठी त्यांच्या रि स्ट्रक्चरिंग साठी काय लक्ष देणार आहोत की नाही ? काही एमआयडीसीमध्ये तर लोकांनी आता घर बांधलेली आहेत. कुठलाही भूखंड जर कमर्शियल असेल तर त्याच्यावरती इंडस्ट्रीचा रिझर्वेशन असलं तर त्याच्यावर रेसिडेन्शिअल चा रिझर्वेशन असू शकत नाही.कोण त्याच्यावरती घर बांधू शकत नाही.पण एमआयडीसीच्या अनेक भूखंडावर आता लोकांनी स्वतःची घर बांधलेली आहेत ती कशी बांधली याचा एकदा तपास सरकारने करावा.अशी मागणी यावेळी आमदार निलेश राणे यांनी केली.










