वार्षिक सर्वसाधारण सभेत महिलांच्या एकजूटीचे दर्शन
सावंतवाडी । प्रतिनिधी : घराचे व्यवस्थापन उत्कृष्टरित्या सांभाळणार्या महिला आज कोणत्याही क्षेत्रात कमी नसल्याचे त्यांनी आपल्या कार्य कतृत्वाने सिद्ध केले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत बचतगटांच्या माध्यमातून महिला लहान मोठे व्यवसाय करीत आर्थिक सक्षम होत आहेत. या माध्यमातून संसाराचा गाडा हाकतानाही त्यांना मदत होत असून समाजातही आपले वेगळे स्थान त्यांनी निर्माण केले आहे. यासाठी सदर महिलांना प्रेरणा देत त्यांना सहकार्य करणाऱ्या अनमोल महिला प्रभाग संघाचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांनी काढले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नतीअभियान अंतर्गत अनमोल महिला प्रभाग संघ, तळवडेच्यावतीने मळगांव येथील शालू मंगल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती प्रियांका गावडे म्हणाल्या, मी सभापती असताना लावलेल्या या छोट्याशा रोपट्याचे आज विशाल वटवृक्षात रूपांतर झालेले पाहून आनंद होत आहे. महिलांनी त्यांचे हे कार्य असेच सुरू ठेवून लहान मोठ्या उद्योग व्यवसायातून स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे. हीच महिला सक्षमीकरणाची नांदी ठरेल.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती पंकज पेडणेकर, माजी पं. सं. सदस्य रुपेश राऊळ, निरवडे सरपंच हरी वारंग, मळगांव सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, माडखोल माजी सरपंच संजय लाड, तळवडे सरपंच मेस्त्री, ओटवणे ग्रा.प. सदस्य रविंद्र म्हापसेकर, मळगांव ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण गावकर, सावंतवाडी खरेदी विक्री संघ चेअरमन सखाराम ठाकूर, मळगांव पोलीस पाटील रोशनी जाधव, उमेद अभियान जिल्हा व्यवस्थापक निलेश वालावलकर, तालुका व्यवस्थापक प्रदीप ठाकरे, स्वाती रेडकर, रिधीमा पाटकर व शिवानंद गवंडे, प्रभाग समन्वयक भिडे ,समुपदेशक अर्पिता वाटवे व नमिता परब,लुपीन फाऊंडेशनचे नारायण परब, समन्वयक राठोड,भंडारी, प्रज्ञा मॅडम, तालुका कृषी अधिकारी सावंतवाडी प्रमोद बनकर, मंडळ कृषी अधिकारी गव्हाणे, वाघमारे तसेच निरवडे व तळवडेतील सर्व कृषी सहाय्यक आदी उपस्थित होते.
अनमोल महीला प्रभाग संघ तळवडे अंतर्गत समृद्धी ग्रामसंघ तळवडे, तिरंगा ग्रामसंघ तळवडे,दुर्गा ग्रामसंघ कुंभारगाव,सिद्धी ग्रामसंघ बादेगाव,नवसंजीवनी ग्रामसंघ निरवडे, शारदा ग्रामसंघ मळगांव, ज्योती ग्रामसंघ ब्राम्हणपाट, जीवन ग्रामसंघ कुंभार्ली, परी ग्रामसंघ निरवडे, माऊली ग्रामसंघ नेमळे व सावित्रीबाई फुले ग्रामसंघ नेमळे आदी ११ महीला संघ
तसेच मळगांवमधील विविध बचत गटांच्या महिलांनी सहभाग घेतला.
यावेळी विविध प्रकारचे खाद्य पदार्थ, कपडे, काथ्याच्या वस्तू, मसाले यांसारख्या वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशास्वीतेसाठी प्रभाग समन्वयक सचिन नाईक, प्रभाग संघ व्यवस्थापक रुपाली गुडेकर तसेच सर्व केडर यांनी काम पाहिले. यावेळी प्रभाग संघातील पंधराशे हून अधिक महिला उपस्थित होत्या.
फोटो – अनमोल प्रभाग संघ तळवडेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित पदाधिकारी व महिला
Sindhudurg