क्लस्टर बल्क मिल्क कुलर युनिटचा मळगांव येथे भव्य शुभारंभ
सहकार्याबद्दल गोकुळ दूध संघाचे मानले आभार
सावंतवाडी । प्रतिनिधी : गोकुळ दुध संघानेही ते कोल्हापूर जिल्ह्यात दुधउत्पादकाला जे जे देतात ते सर्व काही येथील दुधउत्पादकाला द्यावे. दूध संकलन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जी काही तज्ञ मंडळी आपल्या आपल्याकडे उपलब्ध आहेत.जी काही ताकत आपल्याकडे आहे ती सर्व ताकद पहिल्या एक दोन वर्षासाठी गोकुळ मार्फत या जिल्ह्यामध्ये उभी करा.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुधसंकलनबाबतीत आम्ही पाच वर्षाचं नियोजन केलं असून चौथ्या वर्षाच्या आत एक लाख लिटर दूध या जिल्ह्यातनं गोकुळ दूध संस्थेला गेलेलं असेल. त्यासाठी लागणारे जे काही पूर्वनियोजन आहे ते सहा महिन्यांमध्ये आम्ही जिल्हा बँकेच्या माध्यमातून करू, अशी ग्वाही जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यानी दिली.
डॉ. हेडगेवार प्रकल्प अंतर्गत कल्पवृक्ष दुग्ध व्यवसायिक सहकारी संस्था कुंभार्ली,मळगांव यांच्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ कोल्हापूर (गोकुळ) क्लस्टर बल्क मिल्क कुलर युनिटचा भव्य उद्घाटन सोहळा जिल्हा बँकेचे अध्यश मनिष दळवी यांच्या हस्ते करण्यात आला.सदर सोहळा कल्पवृक्ष दुध शीतकरण केंद्र मळगांव येथे संपन्न झाला. या सोहळ्यास कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) चे अध्यक्ष विश्वासराव पाटील, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, गोकुळचे बाबासाहेब चौगुले, बाबासाहेब खाडे,अजित नरके,विजयसिंह मोरे, नंदकुमार डेंगे,कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगांवकर,विद्याधर परब, अरुणजी डोंगळे,बयाजी शेळके, मळगांव गावच्या सरपंचा स्नेहल जामदार, प्रमोद गावडे,डॉ.प्रसाद देवधर, योगेश गोडबोले, अंजलीताई रेडेकर, कल्पवृक्ष संस्था अध्यक्ष संतोष सामंत, उपाध्यक्ष श्रीम.भाग्यश्री केरकर, रूपाली राऊळ, रामकृष्ण पंतवालावलकर व कल्पवृक्ष संस्थेचे संचालकपंचक्रोशीतीलशेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनीष दळवी यांनी यावेळी भगीरथ प्रतिष्ठानचेही आभार मानले. या सगळ्यात भगीरथचे फार मोठे योगदान, सहकार्य जिल्हा बँकेला मिळालेलं आहे. त्यामुळे ज्यांचे ज्यांचे सहकार्य मिळतं त्यांना धन्यवाद देणे हे ख-या अर्थाने आमच्या सारख्या शेतकरी प्रतिनिधीचे कर्तव्य आहे. आणि म्हणून या शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न वाढण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याला शेतीबरोबर त्याचा मुख्य व्यवसाय म्हणून दूध उत्पादनाच्या दृष्टिकोनातून पुढे नेण्याचा संकल्प जिल्हा बँकेच्या वतीने आम्ही केलेला आहे. म्हणून आम्ही गोकुळच्या सोबत असुन गोकुळच्या मार्गदर्शनाखाली पुढच्या काळामध्ये काम करणार आहोत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
नऊ वर्ष या जिल्ह्यामध्ये २६० लिटर वरून २२००० लिटरपर्यंत दुधसंकलन जाण्यापर्यंत चांगले वाईट अनुभव या जिल्ह्याच्या माध्यमातून गोकुळने घेतले. गोकुळला लाखो लिटरच्या संकलनाची सवय आहे आणि करोडो रुपयांमध्ये गणित घालण्याची सवय आहे. मात्र, आमच्या जिल्ह्यांमध्ये २६० लिटर दुध संकलन पहील्या दिवशी झालं. त्यात २६०लिटर दुधाची किंमत ही कदाचित तुम्हाला प्रति लिटर तुमच्याकडे खरेदी साधारण दोनशे तीनशे रुपयांनी पडली असेल त्याच्या वाहतुकीचा सहज हिशोब घातला तर आणि एवढा मोठा तोटा सहन करून सुद्धा आज आम्ही तुम्ही नऊ वर्ष आमच्या जिल्ह्याबरोबर राहिला. आमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला जो विश्वास दिला त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो, अशा शब्दात मनीष दळवी यांनी गोकुळचे आभार मानले. यावेळी दूध उत्पादक शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो – मळगाव येथील क्लस्टर बल्क कुलर युनिट चे उद्घाटन करताना जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी सोबत अन्य मान्यवर ( सचिन रेडकर )
Sindhudurg