निरवडे चर्च समोर चारचाकी व दुचाकीत झालेल्या अपघातात दुचाकी स्वराला गंभीर दुखापत- सुदैवाने अनर्थ टळला

 

न्हावेली l श्रेयस गावडे :सावंतवाडी शिरोडा मार्गावर निरवडे चर्च येते झालेल्या चार चाकी व दुचाकीच्या अपघातात कुडाळ येथील दुचाकी स्वराला गंभीर दुखापत झाली असून त्याला अधिक उपचारासाठी कुडाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की गुजरात सुरत येथील दोन पर्यटक निरवडे चर्च येते आपल्या ताब्यातील गाडी क्रमांक जीजे- 01 युएच- 0864 उभी करून ड्रिंक्स करत होते त्यातील एक पर्यटक गाडीच्या बोनेटवर बसला होता तर त्याचा दुसरा मित्र हा शेजारी उभा होता. गाडी उताराच्या दिशेने लावली असल्याने व गाडीला हॅन्ड ब्रेक न लावल्याने गाडीचा ताबा सुटून गाडी मुख्यरस्ता ओलांडून सरळ जाऊन समोरील गडग्यावर आदळली. यात मळेवाडीच्या दिशेने सावंतवाडीकडे जाणाऱ्या दुचाकी स्वराचा अचानक समोर आलेल्या गाडीमुळे आपल्या ताब्यातील गाडीवरील ताबा सुटला व गाडी सरळ जाऊन कारला धडकली यात कुडाळ येथील दुचाकी स्वराला गंभीर दुखापत झाली असून त्याला कुडाळ येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे .

अपघाताची माहिती मिळताच मनसेचे विभाग अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर , रुपेश पारसेकर यांनी अपघात स्थळी जाऊन दुचाकी स्वराला कुडाळ येथील रुग्णालयात दाखल केले. अक्षय पार्सेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही पर्यटक हे ड्रिंक केलेल्या अवस्थेत होते त्यामुळे हा अपघात घडला.

या झालेल्या अपघातात दुचाकी स्वराला किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने आणि जीवित हानी झालेली नाही. अपघात किरकोळ असल्याने कोणत्याही प्रकारची नोंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली नाही.