चिंदर भगवती माऊली पाषाण पुनः प्रतिष्ठापना सोहळ्यास दत्ता सामंत यांची सदिच्छा भेट देत घेतले माऊली देवीचे दर्शन
आचरा -अर्जुन बापर्डेकर
चिंदर गावचे आराध्य दैवत श्री देवी भगवती माऊलीचा पाषाण पुनः प्रतिष्ठापना ११ वर्धापन दिन सोहळा मंगळवार पासून सुरू झाला.या सोहळ्यास शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी भेट देऊन श्री देवी भगवती माऊलीचे दर्शन घेतले.यावेळी देवस्थान बारा पाच मानकरी व चिंदर ग्रामस्थांतर्फे सामंत यांचा प्रमुख मानकरी राजेंद्र पाताडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी चिंदर माजी सरपंच संतोष कोदे,आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, उद्योजक मंगेश गावकर मधुकर पाताडे, अरविंद घाडी, धोंडू घाडी,मनोज हडकर,भाऊ हडकर, आत्माराम नाटेकर,आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, अजित घाडी, संदीप परब यांसह
चिंदर गावचे बारा पाच मानकरी, श्री भगवती सेवा समिती, श्री देवी भगवती उत्साही मंडळ चिंदर भटवाडी, चिंदर भटवाडी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई यांचे पदाधिकारी ग्रामस्थ आदी उपस्थित होते.










