खर्डेकर महाविद्यालयाच्या आंतरवर्गीय शरीर सौष्ठव स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
वेंगुर्ले l दाजी नाईक :वेंगुर्ले येथील बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात युवा महोत्सवानिमित्त कै. काकासाहेब चमणकर स्मृतीप्रित्यर्थ श्री. जगदीश चमणकर पुरस्कृत किशोर सोन्सुरकर सातेरी व्यायामशाळा मार्गदर्शित आंतरवर्गीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सिनियर विभागात “बॅ.खर्डेकर श्री” चा मान कु. अथर्व मंगेश पालव : एफ. बाय. बी. कॉम याने तर ज्युनियर विभाग “बॅ.खर्डेकर श्री” चा मान कु. पवन बबन कांबळे : १२ वी. एम.सी.व्ही.सी याने पटकाविला.
या कार्यक्रमाचे उद्द्घाटन प्रा. वामन गावडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले तर माजी सभापती जयप्रकाश चमणकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले तसेच सुरेंद्र खामकर स्थानिक सल्लागार समिती सदस्य, व श्री. अशोक दाभोलकर, आंतरराष्ट्रीय हॉलीबॉल पंच यांच्या हस्ते हनुमानच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
वेंगुर्ले येथील श्री साई दरबार सभागृहात ही स्पर्धा पार पडली. “खर्डेकर श्री” ही स्पर्धा गेली २६ वर्षे सातत्याने महाविद्यालयात होत आहे. उद्घाटनानंतर माजी सभापती जयप्रकाश चमणकर यांनी उपस्थित यांना मार्गदर्शन केले. यावेळी वेंगुर्ले कॅम्प येथील नाईक जिम फिटनेस सेंटरचे श्री अमित नाईक उपस्थित होते. यावेळी वेंगुर्ले पंचायत समिती माजी सभापती श्री. अभिषेक चमणकर, प्राचार्य एम्. बी. चौगुले, श्री. सुरेंद्र चव्हाण यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास ऐश्वर्य चमणकर, श्री. किशोर सोन्सुरकर, प्रा. डी. जे. शितोळे, (ज्युनियर कॉलेज पर्यवेक्षक), प्रा. देवीदास आरोलकर, सौ. आबोली सोन्सुरकर, प्रा. संजय चमणकर, प्रा. विरेंद्र देसाई, प्रा. बी. जी. गायकवाड, प्रा. हेमंत गावडे आदी प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी पंच म्हणून किशोर सोन्सुरकर महाराष्ट्र कामगार श्री विजेते व अंकित सोन्सुरकर यांनी काम पाहिले.
शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव प्रा. श्री. जयकुमार देसाई, पेट्रन कोन्सील मेंबर श्री, दौलतराव देसाई, प्रशासन अधिकारी, प्रा. डॉ. सौ. मंजिरी मोरे देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन क्रिडा संघालक प्रा. जे. वाय नाईक यांनी केले, व प्रा. हेमंत गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. वरील मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांमध्ये सिनियर विभाग “बॅ.खर्डेकर श्री” प्रथम क्रमांक कु. अथर्व मंगेश पालव : एफ. बाय. बी. कॉम, द्वितीय क्रमांक कु. शंकर लवू गावडे:एस्. वाय. बी. कॉम, तृतीय क्रमांक कु. लक्ष्मण गुरुनाथ परब: टी. वाय. बी. कॉम तर ज्युनियर विभाग “बॅ.खर्डेकर श्री” प्रथम क्रमांक कु. पवन बबन कांबळे : १२ वी. एम.सी.व्ही.सी, द्वितीय क्रमांक कु. यश शंकर सावंत : १२ वी, तृतीय क्रमाक कु. स्वर्णिम अभिषेक देऊलकर : ११ वी. एम.सी.व्ही.सी. यांनी प्राप्त केला.











