आबलोली : गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा काजुर्ली नं.१ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर वाघमारे, सहकारी शिक्षक लवकुश जुवारे, दीपक गुरव, श्रीमती सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच काजुर्ली गावच्या सरपंच मेघना मोहिते,उपसरपंच सुधाकर गोणबरे, पोलिस पाटील सीमा लिंगायत, ग्रामपंचायत सदस्य सखी सावंत, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य प्रशांत साळवी, संतोष पालकर यांसह गावातील शिक्षणप्रेमी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळेमध्ये मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेची पूजन करण्यात आले.
शिवमूर्तीची गावामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनी आकर्षक वेशभूषा केलेल्या होत्या.
विद्यार्थी व मान्यवरांनी आपल्या मनोगतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आपले विचार मांडले. मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.










