खेड(प्रतिनिधी) मनात जिद्द, चिकाटी व अथक परिश्रम करण्याची सकारात्मक मनोवृत्ती असेल तर जीवनात नक्कीच यश संपादन करू शकतो. परिस्थिती बेताची असताना देखील खेड तालुक्यातील नांदगाव पोटेवाडी येथील एका शेतकरी कुटुंबातील प्रवीण प्रकाश तांबीटकर यांनी अथक प्रयत्न घेत राष्ट्रीय सुरक्षा दलात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.
प्रवीण याने अनेक अडचणींचा सामना करून त्याने राष्ट्रीय सुरक्षा दलात जाण्याचे स्वप्न साकार केले आहे. प्रवीणने आपले सुरुवातीचे शिक्षण गावच्या जिल्हा परिषद शाळेतून पूर्ण केले. व दहावी बारावी सहजीवन कॉलेज येथे पूर्ण केले. पुढे करियर करायला पाहिजे म्हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्था भडगाव येथे दोन वर्षाच इलेक्ट्रिक कोर्से केले. नोकरी मिळेल या आशेने त्याने कामासाठी मुंबई गाठली. काही महिने काम देखील केले या दरम्यान दोन मित्र हे आर्मी मध्ये लागले आणि त्यावेळी त्यांच्यांशी सवांद देखील झाला. कॉलेज मध्ये असतानाच त्याला देश सेवा करायचे स्वप्न त्याने बाळगले होते. त्याला देशसेवेची स्वप्ने हि झोप लागून देत नव्हती.
मुंबई मध्ये नोकरी करत असतानाच त्याने सातत्याने मैदानी सराव सुरु केला. सराव आणि नोकरी सुरु असताना खेड कर्जी येथे गावी विद्युत पारेषण विभागाकडे एक कंत्राटी वायरमन जागा निघाली. तिथे परीक्षा दिली आणि पास देखील झाला आणि कामावर रुजू झाला त्याला इलेक्ट्रिक कोर्स केला त्याचा फायदा झाला. हि नोकरी करत तो कुटुंबाला मदत करत होता. नोकरी करून आपली देश सेवेचे स्वप्न पूर्ण होणार नाही त्याला माहिती होत त्याने आपलं मैदानी सराव हा सातत्याने सुरु ठेवला होता.
मैदानी सराव सुरु असताना त्याला बोरज खेड येथील नॅशनल ॲकॅडमी कॅम्प चे किशोर अदावडे यांची भेट झाली. नंतर प्रवीण ने ॲकॅडमी जॉइंट केली त्याने पोलीस, आर्मी, सीआयएसफ याची त्याने परीक्षा दिली पण त्याला अपयश आल
.मात्र अपयश आले तरी तो खचून गेला नाही त्यांनी आपले प्रयत्न हे सुरूच ठेवले. नंतर त्याने राष्ट्रीय सुरक्षा दल भरतीची पहिली परीक्षा गुजरात येथे दिली मात्र लेखी मध्ये त्याला अपयश आल पुन्हा भरती निघाली तेव्हा त्याने यश खेचून आणले . त्याने राष्ट्रीय सुरक्षा दल भरतीचे स्वप्न सत्यात उतरवले. यावेळी त्याला अॅकॅडमीच्या दिक्षिता भुवड यांनी अदावडे यांचे सहकार्य व मार्गदशन लाभले.
कोणत्याही श्रेत्रात यश संपादन करायचे असेल तर मनात जिद्द, चिकाटी व अथक परिश्रम करण्याचे सातत्य असणे गरजेचे आहे. यशाचे गमक सर्व परिवार आणि ॲकॅडमीचे प्रशिक्षक यांचे असल्याचे प्रवीण सांगतो. परिस्थिती कितीही हलाखीची असली तरी जिद्द आणि चिकाटी व मेहनतीच्या जोरावर परीक्षांना तोंड दिले तर यश नक्कीच मिळते हे प्रवीण ने दाखवून दिले आहे. त्याच्यावर तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.











