स्मार्ट प्रोऍक्टिव्ह अबॅकस सेंटरच्या यशस्वी मुलांचा गौरव
सावंतवाडी । प्रतिनिधी : समर कॉम्पिटिशन आणि नुकत्याच राज्यस्तरीय घेण्यात आलेल्या प्रोऍक्टिव्ह स्पर्धेत अचूक गणिते सोडवून ट्रॉफीचे मानकरी होत घवघवीत यश संपादन केलेल्या सावंतवाडी – वेंगुर्ला येथील स्मार्ट प्रोऍक्टिव्ह अबॅकस सेंटरच्या मुलांना नुकतेच खास कार्यक्रमात विशेष पारितोषिक व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. गौरविण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थाचे भरभरुन कौतुक केले.
हा कार्यक्रम नुकताच सातेरी मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून देवगड नगरपंचायतीच्या उपनगराध्या सौ. मिताली सावंत, एसटी व कामगार सेना वेगुर्ल्याचे उपतालुका प्रमुख संजय गावडे, सावंतवाडी नगरपालिकेचे कर विभागाचे नागेश बिद्रे स्मार्ट प्रोऍक्टिव्ह अबॅकस च्या संचालिका कोमल मेस्त्री व शर्मिला पांचाळ उपस्थित होते.
यावेळी बोलतांना उपनगराध्यक्षा सौं मिताली सावंत म्हणाल्या, अबॅकस परीक्षेच्या माध्यमातून स्मार्ट प्रोएक्टीव्ह अबॅकस सेंटर च्या विद्यार्थ्यांमध्ये खूपच चाणक्य दिसून आले आहेत. गणित सोडवताना विद्यार्थ्यांची क्षमता झपाट्याने वाढत आहे. खरोखरच सावंतवाडी वेंगुर्ला सेंटरचे हे काम कौतुकास्पद आहे.
यावेळी संजय गावडे व नागेश बिद्रे म्हणाले, मातीला आणि दगडाला आकार देऊन त्यातून एक आकर्षक सुंदर मूर्ती बनवण्याच काम जसे केले जाते तसेच काम प्रोऍक्टिव्ह अबॅकस आपल्या विद्यार्थाना घडविण्यात करत आहे.
कोल्हापूर मध्ये जून 2023 झालेल्या ‘प्रोऍक्टिव्ह अबॅकस समर कॉम्पिटिशन 2023’मध्ये ‘स्मार्ट प्रोऍक्टिव्ह अबॅकस सेन्टर च्या 15 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले होते. तसेच नुकत्याचा राज्यस्तरीय घेण्यात आलेल्या प्रोऍक्टिव्ह च्या डिसेंबर – जानेवारी 2023-24 च्या अबॅकस स्पर्धेसुद्धा ‘ 21 मुलांनी यश मिळवले होते. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासह व देशभरातील एकूण 17000 मुलांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत इयत्तेप्रमाणे गट होते. छोटा गटात नचिकेत सावंत पहिला A1 (4.22ms 100/100), हर्षिता पाटकर C1(4.20ms 100/100),सार्थक भाटकर पहिला B2 (4.8ms 97/100), हर्ष नाईक दुसरा B2( 3.10ms 96/100),पार्थ सावंत पहिला B1 (4.24ms 95/100), आराध्य पोलजी पहिला A2 (5.7ms 97/100), दुर्वांक मोचेमाडकर तिसरा C2 ( 4.46ms 92/100), गौरांग वेलकर तिसरा C1 (5.16ms 90/100), जयेश गावडे C3 चौथा ( 5.28ms 89/100),ब्रिस्टन फर्नांडिस सातवा (6.0ms 84/91), तर मोठा गटातून कनिष्का गावडे पहिली D1 (5.6ms 97/100), गीता मेहता पहिली D2 (5.30ms 98/100), तनया गावडे पहिली (5.8ms 95/100), सात्विक भाटकर दुसरा (5.34ms 93/100), नम्रता मेहता चौथी (6.0ms 80/100), राज नवार पहिला I1 (5.14ms 97/100),गौरव कासवकर सहावा (79/100), प्रणव गावडे पहिला I3(5.31ms 92/100), लावण्या गावडे पहिली H (5.30ms 90/100),तनाज सय्यद पहिली 4थी लेवलJ(5.18ms 97/100),यज्ञेश गावडे दुसरा 4थी लेवल J(5.30ms 92/100)
स्पर्धेचे स्वरूप 6 मिनिट मध्ये 100 गणिते सोडवणे असे होते. आजकाल च्या स्पर्धेच्या युगात कमीत कमी वेळेत बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करत आपली बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी या स्पर्धा पद्धतीचा उपयोग होत असून यामधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत मोलाची भर पडत असते. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातून निवडून आलेल्या या मुलांचे त्यांच्या शाळांमधून खुप कौतुक होत आहे.
या कार्यक्रमात एक विरंगुळा म्हणून पालकांना त्यांच्या रोजच्या व्यस्त जीवनातून थोडासा वेळ स्वतःसाठी म्हणून काही मनोरंजक खेळ ठेवले होते तर पालकांनी विद्यार्थ्यांसोबत ते अगदी आनंदात खेळून एक अविस्मरणीय आनंद घेतला.
स्मार्ट प्रोऍक्टिव्ह अबॅकस, सावंतवाडी-वेंगुर्ला या सेन्टरला बेस्ट सेन्टर हा 2 वेळा किताब मिळाला आहे या कार्यक्रमाला प्रोऍक्टिव्ह अबॅकस चे डायरेक्टर गिरीश करडे, सारिका करडे,तेजस्विनी सावंत,मार्केटिंग हेड अजय मणियार,ज्योती मॅडम व सर्व प्रोऍक्टिव्ह टीम चे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार शुभम धुरी यांनी केले.












