रयतेचे राज्य व्हाव, ही तो श्रींची इच्छा ! आजच्या सामाजिक व्यवस्थेत प्रत्येकाने अंतर्मुख होण्याची गरज— ग्रामस्थांचे प्रतिपादन !

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी –– छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना,ते रयतेचे राज्य आणि स्वराज्य व्हावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.आणि ते यशस्वी सुद्धा झाले. मात्र त्यासाठी त्यांना अनेकदा अग्नीदिव्यातून जावे लागले. तरीही प्रसंगी खडतर- खंबीर होऊन त्यांनी रयतेला प्राधान्य दिले.मात्र आजच्या सामाजिक आणि प्रशासनाचा विचार करता, प्रसंगी अंतर्मुख होऊन प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. असे प्रतिपादन भवानी चौकातील शिवजन्मोत्सवानंतर बोलताना अनेक ग्रामस्थांनी आपले व्यक्त केले..

 

 

फोंडाघाट येथील पांगळेवाडी, गडगेसकल, सुतारवाडी,वाडेकरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने,पर्वताच्या कडेकपारीच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर कुळाचीवाडी येथील भवानी चौकातील, शिवस्मारकामध्ये शिवजयंती सोहळा उत्साहात संपन्न झाला. महाराजांच्या जंगी मिरवणुकीनंतर शिवपूजन झाले.यावेळी बिडवाडी ग्रुपने, थरारक मल्लखांब ,लाठीकाठी आणि तलवारबाजी ची प्रात्यक्षिके दाखविल. त्यानंतर श्रीसत्यनारायण पूजा, महिलांसाठी हळदीकुंकू संपन्न झाले.कार्यक्रम स्थळी विविध मान्यवरांचा श्रीफळ- शाल- पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संध्याकाळी स्थानिक सौ .गीता गोसावी यांचे सुश्राव्य कीर्तन व भजन मंडळांनी आपली भजनी सादर केली. रात्री संत कान्होपात्रा हे दशावतारी नाटक अमृतनाथ मंडळ म्हापन यांनी सादर केले. यावेळी वाड्यांवरील आभार वृद्धांनी आनंद लुटला.

 

 

सदर तिसऱ्या वर्षी शिवशंभो सामाजिक कला क्रीडा मंडळ ,फोंडा आयोजित शिवजयंती उत्सव पार पाडण्यासाठी अशोक लाड, अनिल लाड, गुरुनाथ मेस्त्री,अनंत तळेकर, अशोक लाड ,सतीश खांबाळेकर, दिनेश लाड, सचिन लाड, गणेश मेस्त्री इत्यादी सर्व मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले…..