कणकवली : अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवलीत शिवजयंतीदिना निमित्त दिनांक १९ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्र. प्राचार्य डॉ. महेश साटम , प्रशासकीय अधिकारी श्री. शांतेश रावराणे व मेकॅनिकल विभागाचे प्राध्यापक कल्पेश सुनील कांबळे (सांस्कृतिक प्रमुख) यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साह सोहळा संपन्न झाला.
महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात रॅली द्वारे तसेच ढोल ताश्याच्या गजरात शिवज्योती चे आगमन केले. शिवपूजन , शिवपाळणा, आरती तसेच शिवगर्जनेने सर्वच उपस्थितांच्या उत्साहात भर घातली. मुलींनी लेझीम नृत्याद्वारे विविध कलाकृतींचे उत्तम सादरीकरण केले.

सोहळ्याचे सूत्रसंचालन महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. गौरांगी सावंत हिने प्रभावीपणे केले. महाविद्यालयाच्या कु. इंद्रगोपाल बिल्ले या विद्यार्थ्यांने उत्कृष्ट भाषण शैली द्वारे छत्रपतींची महती दिली तसेच समूहागीताने विद्यालयाच्या वातावरणात भर घातली.
“पावनखिंड” हा सजीव देखावा आकर्षणाचा विषय ठरला.
सदर सोहळा जोमाने पार पाडण्यासाठी कु.शुभम पाटील,कु.आसीम फरास,कु. बालाजी चव्हाण, कु. प्रज्वल वायचळ,कु.सौरभ कवडे, कु. सुशांत पाटील,कु. रोहित जाधव, कु. निखिल बंधीगरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमासाठी एस. एस. पी. एम. संस्थेचे संस्थापक केंद्रीय उद्योगमंत्री मा. नारायण राणे, अध्यक्षा सौ. निलमताई राणे, उपाध्यक्ष माजी खासदार निलेश राणे, सचिव आ. नितेश राणे, प्रशासकीय अधिकारी शांतेश रावराणे, प्र. प्राचार्य डॉ. महेश साटम, सर्व विभागप्रमुख तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रोत्साहित केले.












