वेंगुर्ले | दाजी नाईक : महाराष्ट्रात किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे यांच्या नेतृत्वाखाली ग्राम परिक्रमेची सुरुवात झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही भाजपा किसान मोर्चा आयोजित जिल्हा “ग्राम परिक्रमा यात्रा” चा शुभारंभ अणसुर या गावी, आज मंगळवार 20 फेब्रुवारी रोजी करण्यात आला. या उपक्रमाचा शुभारंभ सिंधुदुर्ग भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, विधानसभा प्रमुख मा.आम. राजन तेली, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, प्रदेश सदस्य डाॅ. भाई बांदकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, जिल्हा उपाध्यक्ष तथा किसान मोर्चा प्रभारी प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, ग्राम परिक्रमा यात्रा मंडल संयोजक विजय रेडकर, किसान मोर्चा प्रदेश सदस्य बाळू प्रभु, जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस, जेष्ठ नेते बाळा सावंत, सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण परब, किसान मोर्चा जिल्हा कार्यकारिणी सदस्य आनंद ऊर्फ बिट्टू गावडे व संदिप देसाई, सत्यवान पालव, सरपंच संघटनेचे अध्यक्ष पप्पू परब, शक्तिकेंद्र प्रमुख कमलेश गावडे व गणेश गावडे व विजय बागकर, पाल सरपंच सौ.कावेरी गावडे, मातोंड सरपंच सौ. मयुरी वडाचेपाटकर, होडावडा उपसरपंच राजबा सावंत, किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस ज्योती देसाई व महेश संसारे, एफ.पी.ओ.चे बापू पंडित ,कृषी आयडॉल दादा सामंत ,किसान मोर्चा उपाध्यक्ष दिपा काळे, हरिभाऊ केळुसकर, मच्छिमार नेते वसंत तांडेल, मालवण मंडल अध्यक्ष महेश सारंग, प्रसाद भोजने , वजराट शक्तिकेंद्र प्रमुख नितीन चव्हाण अन्य मान्यवर उपस्थित होते.
ग्राम परिक्रमा यात्रा शुभारंभ वेंगुर्ला तालुक्यातील अणसुर गावचे क्रियाशील सरपंच सत्यविजय गावडे यांच्या निवासस्थाना पासून सुरू करण्यात आला. याप्रसंगी डाॅ. भाई बांदकर , जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, विधानसभा प्रमुख मा. आम. राजन तेली, मा. रणजित देसाई यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी किसान मोर्चाच्या ग्रामपरीक्रमा यात्रेचा गोमाता पुजनांने शुभारंभ केला. शेतकऱ्यांना कोकण कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ मुंज , मंडल कृषी अधिकारी सौ. हर्षा गुंड यांनी आंबा मोहरावर येणाऱ्या थ्रीप्स वर प्रतिबंध करण्यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले .या परिक्रमा यात्रेत अणसुर , पाल, तुळस मोचेमाड, आसोली, मातोंड भागातील शेतकरी सहभागी झाले होते .










