खेड(प्रतिनिधी)
तालुक्यातील मुरडे – मोहल्ला येथे सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या लाखोंची हानी झाली आहे. येथील नगरपरिषदेच्या अग्निशमक कर्मचाऱ्यांनी तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
मुरडे – मोहल्ला येथे वणवा लागल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच तातडीने घटनास्थळी पोहोचले. काही क्षणातच आगीचा एकच भडका उडाला. ग्रामस्थांनी आपापल्या घरातील पाणी आणून आग विझवण्याचा आटोकात प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने ग्रामस्थांनी येथील नगरपरिषदेच्या अग्निशामक केंद्रास कळवले.
केंद्रातील फायरमन दीपक देवळेकर, शाम देवळेकर, जयेश पवार, प्रणय रसाळ, वाहन चालक विद्याधन पवार, प्रणय घाग आदी तातडीने घटनास्थळी पोहचले. प्रयत्नानंतर सायंकाळी ५.४० वाजण्याच्या सुमारास वणवा आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. त्या वाढव्यात लाखोंची झाडे व गवत खाक झाले आहे.










