रत्नागिरी : अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, कोकण विभाग, ठाणे कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना सन 2024 2025 या शैक्षणिक वर्षासाठी वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी पदविका, डिप्लोमा, पदव्युत्तर अभ्यासक्रम व व्यावसायिक अभ्यासक्रम इत्यादीसाठी प्रवेश घ्यावयाचे आहेत अशा इच्छुक अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे जात पडताळणी प्रस्ताव https://etribevalidity.mahaonline.gov.in या संकेत स्थळावर दि. 31 मार्च 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा व प्रस्तावाची प्रत प्रत्यक्ष समिती कार्यालयास जमा करावी, असे कोकण विभाग, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे सह आयुक्त तथा उपाध्यक्ष, दिनकर जि पावरा यांनी कळविले आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जमाती राखीव प्रवर्गात लाभ घेण्याकरिता संबंधित उमेदवारास अर्ज भरताना जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) प्रवेश प्रक्रिया नोंदणी अर्जासोबत जोडणे अत्यावश्यक आहे. अर्जदार यांनी मुदतीत जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज सादर न केल्यास जात वैधता प्रमाणपत्रा अभावी होणाऱ्या विलंबास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही, याची नोंद घेण्यात यावी. अर्जदारांना जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत काही अडचणी असल्यास ठाणे समिती कार्यालयाचे दूरध्वनी क्रमांक 022-25302930 वर संपर्क करावा.










