न्हावेली । प्रतिनिधी : अथायु मल्टीस्पेशालिटी हॅास्पिटल कोल्हापूर,व श्री साटम महाराज सेवा कला क्रिडा मंडळ व सर्व ग्रामस्थ निरवडे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते २ वाजेपर्यत प्राथमिक आरोग्य केंद्र ,निरवडे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
यामध्ये ॲजिओग्राफी, ॲजिओप्लास्टी, बायपास, ह्रदयविकार, हाडांचे फ्रॅक्चर, गुडग्याचे लिंगामेन्ट शस्रक्रिया, कॅन्सर ॲापरेशन,मेदू व मणका ॲापरेशन,दुर्बिणीद्वारे मुतखडा व प्रोस्टेट ॲापरेशन,इत्यादी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत पिवळे व केशरी रेशन कार्ड व आधारकार्ड धारकांना मोफत ॲापरेशन सोय होणार आहे तसेच मोफत रक्तातील साखर तपासणी,बीपी व ईसीजी तपासणी,मोफत डायलिसिस,सवलतीच्या दरात होणार आहे.तरी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संजय तानावडे ९१३०६५०१०२ व दिग्विजय पाटील दिनेश डावरे यांच्याशी संपर्क साधावा.








