वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत सिंधुदूर्ग जिल्ह्यातील 46 कामांना रु.3,36,00,000/- रुपये निधी मंजूर

भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या मागणीला यश – जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे

आघाडी तर्फे सामाजिक न्याय मंत्री अतुल सावे यांच्या सहित माजी खासदार निलेश राणे ,आमदार नितेश राणे,राजन तेली यांचे विशेष आभार.

सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच महायुतीच्या सरकारने वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत सिंधुदूर्ग जिल्ह्यातील 46 कामांना रु.3,36,00,000/- रुपये निधी मंजुर झाला असून या पुढेही तांडा वस्तीना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल तसे इतर हेड मधून ही भटके विमुक्तांना निधी उपलब्ध होईल असा विश्वास भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदूर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे यांनी व्यक्त केला आहे.

“7.5 वर्ष सत्तेत असून ही तांडावस्तीचा निधी मंजूर करण्यास शिवसेना उबाठा खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक अपयशी, राणे साहेब यांच्यावर टीका करण्यापेक्षा आपण आपल्या मतदारसंघात काय दिवे लावले त्याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे . शिवसेना उबाठा गटाला मतदार पुढील निवणुकीत नक्की जागा दाखवेलच अशी टीका नवलराज काळे यांनी शिवसेना उबाठा गटावर केली आहे.”

तांडा वस्ती निधी मंजुरी बाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा भटके विमुक्त आघाडीला मोठे यश मिळाले आहे. सदर कामे मंजूर होणे करीता कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातून आमदार नितेश राणे, कुडाळ मालवणी विधानसभा मतदारसंघातून निलेश राणे तर सावंतवाडी कुडाळ दोडामार्ग विधानसभा मतदारसंघ राजन तेली सामाजिक न्याय मंत्रालय येथे शिफारशी केल्या होत्या तसेच सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भटके विमुक्त आघाडी जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे,जिल्हा उपाध्यक्ष बाळा गोसावी,जिल्हा सरचिटणीस दिपक खरात,संतोष साळसकर,भरत गोरे यांनसह इतर सर्व आघाडीचे पदाधिकारी, मंडल अध्यक्ष यांनी यशस्वी पाठपुरावा केला.

या अजून उर्वरित आराखडा मधील कामांच्या मंजुरीसाठी पाठपुरावा करत राहणार असेही जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे यांनी समाजाला विश्वास दिला आहे. यावेळी आघाडीतर्फे सामाजिक न्याय मंत्री अतुल सावे यांच्या सहित माजी खासदार निलेश राणे ,आमदार नितेश राणे,राजन तेली यांचे विशेष आभार मानण्यात आले.युती सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली भटके विमुक्त समाजाला नक्की न्याय देईल असा विश्वास जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी शांताराम उर्फ बाळा गोसावी यांना व्यक्त केला आहे.