वैभववाडी ग्रामीण रुग्णालयाचा वीज पुरवठा सुरळीत ; आमदार नितेश राणे यांच्या अधिकाऱ्यांना सुचना 

वैभववाडी प्रतिनिधी

येथील ग्रामीण रुग्णालयाचा वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना सुचना केल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत चालू झाला आहे.

वीज बील थकल्यामुळे वीज वितरण कंपनीने वैभववाडी ग्रामीण रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडित केला होता. या प्रकराची माहिती मिळताच आमदार नितेश राणे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना संपर्क साधला. रुग्णांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या. वीज पुरवठा तात्काळ सुरू करुन घ्या. अशा सूचना केल्या. आमदार नितेश राणे यांच्या सुचनेनंतर वैभववाडी ग्रामीण रुग्णालयाचा वीज पुरवठा सुरळीत झाला आहे.