खेड जे. सी. आय. सामाजिक संस्थेच्या वतीने बिरमणी येथील निराधार भगिनींला आधार

खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील बिरमणी येथील निराधार भगिनींला खेड तालुका जे. सी. आय. संस्थेच्या वतीने घरगंटी स्वरूपात मदत करत चरितार्थासाठी हातभार लावला आहे.

काही वर्षापूर्वी अपघातात पतीच एक पाय गेला आणि पतीला कायमचे अपंगत्व आले. तेव्हापासून पती मानसिक रुग्ण झाले. संपूर्ण कुटुंबाचा भार एकटी वर पडला अशातच एक शिक्षण घेणारा मुलगा व कमावणारे कुणीही नाही. अशा परिस्थितीत मिळेल ते काम, तसेच मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होती. याबाबत खेड जे. सी. आय संस्थेला माहिती मिळताच या निराधार भगिनींला आधार देण्यासाठी या सामाजिक संस्थेच्या वतीने उदरनिर्वाहासाठी घरगंटी देण्याचे ठरविण्यात आले. व नुकत्याच गोळीबार मैदानावर झालेल्या फेस्टिव्हल कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्री आदिती ताई तटकरे यांच्या हस्ते बिरमणी येथील सौ. शामल शाम मोरे यांना घरगंटीचे वाटप करुन उदरनिर्वाहासाठी हातभार लावला आहे.

सौ. शामल मोरे यांनी याबाबत बोलताना सांगितले की, मला जगण्यासाठी हातभार लावण्यासाठी जे. सी. आय. संस्थेने मला जी मदत केली आहे. त्याबद्दल संस्थेचे आभार मानले आहे.