खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील चाटव वाडीबीडदरम्यान जगबुडी नदीवर ३ कोटी रूपये खर्चून पुलाची उभारणी केली आहे. मात्र पुलाजवळून जाणाऱ्या उच्च दाबाच्या विद्युतवाहिनीमुळे वाहतूक खुली होण्यास अडथळा निर्माण झाला होता. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर उच्चदाबाची विद्युतवाहिनी हटवल्याने पूल वाहतुकीसाठी अखेर खुला झाला आहे.
नाबार्डमधून ३ कोटी रूपये खर्चून सार्वजनिक बांधकाम खात्याकडून या पुलाची पुनर्बांधणी करण्यात आली होती. मात्र या पुलाजवळून जाणाऱ्या उच्चदाबाच्या विद्युतवाहिनीमुळे पूल वाहतूक खुला होण्याच्या प्रतीक्षेत होता. अखेर ग्रामस्थांच्यारेट्यानंतर पुलावरून जाणारी उच्चदाबाची वाहिनी महावितरणने हटवल्याने पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे.










