खेड (प्रतिनिधी) कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पोरबंदर-कोच्युवेली एक्सप्रेसला तात्पुरत्या स्वरूपात स्लीपर श्रेणीचा एक अतिरिक्त डबा वाढवण्यात आल्याचे रेल्वेप्रशासनाने जाहीर केले.
त्यानुसार २०९१०/२०९०९ क्रमांकाची पोरबंदर-कोच्युवेली एक्सप्रेस २२ फेब्रुवारी रोजी, तर परतीच्या प्रवासात २५ रोजी स्लीपर श्रेणीच्या एक अतिरिक्त डब्यांची धावणार आहे. एक्सप्रेसलाअतिरिक्त डबा वाढवण्यात आल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.










