खेड(प्रतिनिधी) कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या मांडवी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या पेडणे येथील विवाहितेस अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तिला उपचारासाठी तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले असता उपचारा पूर्वी तिचे निधन झाले ही घटना २२ फेब्रुवारी रोजी सांयकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
सौ. संचिता संजय मोटे (वय ४१ वर्षे, रा. रा.सक्रारवाडी तोरसे गाव ता. पेडणे राज्य-गोवा) असे त्या मृत्युमुखी पडलेल्या विवाहितेचे नाव आहे सौ मोटे या मांडवी एक्सप्रेस ट्रेनने प्रवास करीत असता त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने सायंकाळी ५.३० वा. चे सुमारास उपजिल्हा रुग्णालय कळंबणी ता. खेड येथे १०८ अॅबुलन्सने घेउन जाउन दाखल केले असता उपचारा पूर्वी तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासुन मयत घोषीत केले या प्रकरणी येथील पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.








