महायुतीचे योगेश कदम, महाविकास आघाडीचे संजय कदम यांच्यात रंगणार सामना
खेड(प्रतिनिधी) दापोलीतील लढत राज्यातील मोठ्या लक्षवेधी लढतींपैकी एक लढत, मानली जातेय. त्याला तशी पार्श्वभूमीही आहे. निवडणुकीत दोन शिवसेना समोरासमोर उभ्या आहेत. दोन्हीकडच्या उमेदवारांनी मतदारसंघावर दावा केला आहे. असे असले तरी गत दोन ते अडीच वर्षांच्या कालावधीत दापोली मतदारसंघातील राजकीय घडामोडींनी राज्याचे लक्ष वेधले होते. त्या अनुषंगाने आताची निवडणूक निश्चितच महत्वपूर्ण व लक्षवेधी असल्याचा राजकीय विश्लेषकांचा होरा आहे.
शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार योगेश कदम हे रिंगणात आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार संजय कदम यांनी प्रस्थापितांच्या विरोधात आव्हान उभे केले आहे. राज्यातील सत्तासंघर्ष, पक्षांतर्गत फूट यानंतर होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. सत्तासंघर्षाच्या पेचप्रसंगाचा शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात प्रभाव पहायला मिळाला. काही काळ कार्यकर्ते विचलित झाले होते. त्यानंतर मतदारसंघातील घडामोडींमध्ये माजी आमदार संजय कदम यांनी राष्ट्रवादीतून घरवापसी करत शिवसेना ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून लौकिक असलेल्या या मतदारसंघात शिवसेनेची विभागणी झाली. या दरम्यानच्या काळात दोन्ही प्रबळ दावेदारांनी आपापला पक्ष वाढवण्यासाठी मोर्चेबांधणी केलेली पहायला मिळाली. त्यामुळे सध्या कोणाचे किती वर्चस्व, हे आत्ताच निश्चितपणे सांगता येणे कठीण आहे.
‘नवी विटी, नवा दांडू’
दोघांनाही राजकारणातली आपली मांडणी नव्याने करावी लागणार आहे. दोन्हीकडील आघाड्यांमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचे आव्हान नक्कीच राहणार आहे. सध्यातरी दोन्ही प्रबळ दावेदार तुल्यबळ असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे
या निवडणुकीत मतदारांवर प्रभाव टाकणारे मुद्दे या निवडणुकीत नक्की पहायला ही प्रक्रिया दुय्यम प्रकारची मानली जाते. खरं मिळतील. लोकांचे मत राजकीय पक्ष घडवतात, तर लोक स्वतःचे मत निश्चित करतात. त्यामुळे राज्य व स्थानिक स्तरावरील विविध मुद्दे या निवडणुकीत नक्कीच प्रभाव टाकतील. विकास, लाडकी बहीण योजना, सहानुभूती, बेरोजगारी, शिक्षण, पर्यटन याशिवाय अनेक मुद्दे या निवडणुकीत प्रकर्षाने पहायला मिळू शकतात. निवडणुकीत मित्रपक्षांची साथ हा मुद्दा देखील
तितकाच महत्वाचा ठरू शकतो. किंबहुना रिंगणात असलेल्या अन्य उमेदवारांनी आपला दावा सांगूनही टाकला आहे.
प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात प्रबळ दावेदारांनी गावभेटीवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसले. आमदार योगेश कदम यांनी कार्यकर्त्यांच्या शक्तीप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल केला. तर संजय कदम यांनी
गनिमी काव्याचा वापर करत यावेळी कार्यकर्त्यांसमवेत अर्ज दाखल केला. आगामी काही दिवसात दोन्ही बाजूने स्टार प्रचारकांच्या उपस्थितीत प्रचारसभा होतील.











