फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने राजापूर अर्बन बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार

 

राजापूर (वार्ताहर): राजापूर अर्बन बँकेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ. अनामिका जाधव व उपाध्यक्ष विवेक गादीकर यांचा फोटोग्राफर व्हिडीओग्राफर असोसिएशन राजापूर तालुका यांचे वतीने असोशिएशनचे अध्यक्ष राजेश खांबल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक ज्येष्ठ छायाचित्रकार प्रदिप कोळेकर यांनी केले. तर असोसिएशन सचिव संदेश टिळेकर यांनी फोटोग्राफर व्हिडीओग्राफर असोसिएशन यांचे कार्याची माहिती दिली.

सत्काराला उत्तर देताना सौ. जाधव व श्री. गादीकर यांनी फोटोग्राफर व्हिडीओग्राफर असोसिएशन राजापूर तालुका यांच्या चांगल्या कार्याबद्दल, आत्तापर्यंत राबविल्या गेलेल्या सामाजिक उपक्रमाबद्दल कौतुक केले.

यावेळी असोसिएशनने फोटोग्राफर व्हिडीओग्राफर यांच्यासाठी जमविण्यात आलेली सुरक्षा ठेव रक्कम डेमो चेक स्वरूपात एफडी काढण्यासाठी राजापूर अर्बन बँक नवनियुक्त चेअरमन व्हाईसचेअरमन यांचेकडे सुपूर्द करण्यात केली.

यावेळी बँकेचे माजी अध्यक्ष हनिफ काझी, फोटोग्राफर व्हिडीओग्राफर असोसिएशन खजिनदार चंद्रशेखर माणिक, जेष्ठ फोटोग्राफर चारूदत्त नाखरे, प्रदिप कोळेकर, सभासद अक्षय सोगम आदी उपस्थीत होते.