केंद्रीय मंत्री नारायण राणे ; लर्निंग लिंक्स फाउंडेशन व मास्टर कार्ड चा महिला सशक्तिकरण परिसंवाद संपन्न
सिंधुनगरी : बाळ खडपकर
अनेक उद्योगपतींची श्रीमंती पाहून तशी प्रेरणा आपणही घ्यावी. कोणताही यशस्वी उद्योग श्रीमंती आणू शकतो, म्हणूनच सिंधुदुर्ग जिल्हा उद्योजक जिल्हा घडविण्यासाठी महिलांचाही सहभाग हवा. यासाठी मार्गदर्शन घ्या आपली बुद्धिमत्ता वापरा एक यशस्वी उद्योजक बना व श्रीमंत व्हा! व माझा सिंधुदुर्ग जिल्हा देशातील श्रीमंत जिल्हा करा असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शनिवारी सिंधुनगरी येथे झालेल्या सशक्ति महिला परिसंवाद कार्यक्रमात बोलताना केले.
मास्टरकार्ड पुरस्कृत लर्निंग लिंक्स फाउंडेशन मार्फत सिंधुनगरी येथील जिल्हा नियोजन सभागृहात शनिवारी महिला उद्योजक कार्यशाळा महिला सशक्ती करणं परिसंवाद संपन्न झाला. यावेळी केंद्रीय सूक्ष्म लघु व मद्यम उद्योग मंत्री नारायण राणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, लर्निग लिंक्स फाउंडेशन चे उपाध्यक्ष सुदीप दुबे, सहाय्यक उपाध्यक्ष असिमा सिंग यावेळी जि. प. च्या माजी अध्यक्ष सौ संजना सावंत, संद्या तेरेसे, प्रज्ञा ढवण, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे मास्टर कार्ड चे संचालक सौरभ सिंग आदी मान्यवर उपस्थित होते. अपूर्वा शिंदे यांनी उद्योजक महिलांची साधलेला संवाद व केलेले मार्गदर्शन याचे कौतुक ही नारायण राणे यांनी केले.
हा राजकीय कार्यक्रम तर या जिल्ह्यातील महिलांनी उद्योग व्यवसाय करावा त्याने आर्थिक श्रीमंत व्हावे यासाठी या संस्थेने सहकार्यासाठी मार्गदर्शनासाठी पुढाकार घेतला आहे. देशात ही संस्था काम करत असून या जिल्ह्यातही आपल्या महिलांसाठी मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने आपण त्यांना या जिल्ह्यात निमंत्रित केले होते. त्याप्रमाणे ही संस्था या जिल्ह्यात काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तीन कोटी महिलांना लखपती बनविण्याचे जाहीर केले असून महिलांनी उद्योग व्यवसायात म्हणून त्यांनी पाठबळ दिले आहे. अनेक उद्योगपतींची प्रेरणा घेऊन या जिल्ह्यातील महिलांनी उद्योग व्यवसायात पुढाकार घ्यावा, यशस्वी उद्योजक बनवून जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ करावी हा जिल्हा देशात श्रीमंत जिल्हा म्हणून नावारूपात आणण्यासाठी महिलांचा सहभाग आवश्यक आहे असे मार्गदर्शनही केंद्रीय मंत्री नारायण यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्हातील 1300 महिलांना प्रशिक्षण देण्यात आले असून त्यामधील 190 महिलांना 5500 रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली. प्रतिनिधीक स्वरूपात तीन महिलांना गौरविण्यात आले. जिल्ह्यात ज्या महिलांनी उद्योग व्यवसायात चांगले काम केले आहे व संस्थेचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे अशा महिलांना ही आर्थिक मदत करण्यात आली. या परीसंवादामद्ये महिलांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन निलेश जोशी यांनी केले. सुप्रिया वालावलकर, प्रज्ञा ढवन, साक्षी कोचरेकर, भक्ती पळसमकर, साधना माडये आदी मान्यवर उपस्थित होत्या.
लर्निग लिंक्स फाउंडेशन चे सुदीप दुबे म्हणाले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुळे येथील महिलांना या महिला परिसंवादाची संधी मिळाली. महिला उद्योजकाना जोडणे, त्यांना प्रशिक्षण देणे, एक यशस्वी उद्योजक घडविणे यासाठी या जिल्हात आपल्या संस्थेने काम हाती घेतले आहे. यामध्ये महिलांनीही चागला प्रतिसाद दिल्या बद्दल दुबे यांनी गौरव केला.
जिल्हातील महिलांनी अनेक व्यवसायात प्रगती केली असून मार्केटिंगची अडचण अनेक महिलांनी व्यक्त केली. ककुकूटपालन, खानावळ, बेकरी, शेळीपालन पार्लर, सरबत, मसाले, विद्यार्थी क्लास,कॅटरिंग, अगरबत्ती व मेणबत्ती, काथ्या उदयोग, कृषी सेवा केंद्र, भाजीपाला, लाकडी वस्तू, गांडूळ खत, पापड, टेलरिंग, ज्वेलरी, आदी व्यसयाय करणाऱ्या महिलांनी आपली ओळख व आपल्या उद्योगांची ओळख करून दिली. लर्निंग लिन्क च्या अपूर्वा शिंदे शिंदे यांनी प्रत्येक उदयोजक महिलेशी छान संवाद साधला. काही व्यवसाय कल्पक व नवनिर्मीत असून नावीन्यपूर्ण असल्याने सर्वांनीच चांगली दाद दिली.










