मोडकाआगर l वार्ताहर :गुहागर तालुक्यातील वरवेली गावचे सुपुत्र,यशस्वी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते,देश विदेशात फिरून जगभराचा अनुभव घेणारे आणि तरीही आपल्या वरवेली गावाशी नाळ घट्ट बांधून ठेवणारे, वेळोवेळी शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात स्वखर्चाने निधी उपलब्ध करून गावातील विकासकामामध्ये पुढाकार घेणारे योगेंद्र बाळकृष्ण विचारे यांनी वरवेली गावातील तसेच इतर वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी वरवेली फाट्यावर कॉर्नर (बहिर्गोल)आरसा लावल्याबद्दल याठिकाणी होणारे अपघात टाळता येणार आहेत.हा आरसा अपघात क्षेत्र असणाऱ्या वरवेली फाटा येथे बसविणेत आला आहे. आरसा बसविणेच्यावेळी वरवेली गावातील ग्रामस्थ ही या कार्याशी जोडले गेले होते.
ह्या महान कार्यामुळे सबंध परिसरातून योगेंद्र बा. विचारे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव तसेच या कार्याबद्दल कृतघ्नता ही व्यक्त होत आहे.











