तळवली येथे 9 मार्च रोजी भव्य तालुकास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा

 

श्री सोमनागेश्वर सेवा मंडळ व श्री सोमनागेश्वर नाट्य कलामंच तळवली यांचे आयोजन

गुहागर l प्रतिनिधी :तालुक्यातील तळवली येथे श्री सोमनागेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री महोत्सवानिमित्त शनिवार दि. 9 मार्च रोजी तालुकास्तरीय भव्य रेकॉर्ड डान्स शिव करंडक 2024 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री सोमनागेश्वर सेवा मंडळ तळवली व श्री सोमनागेश्वर नाट्य कलामंच तळवली यांच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये ग्रुप व सोलो अश्या दोन प्रकारात ही स्पर्धा पार पडणार आहे.यातील समूह नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांकास रोख रु.5 हजार 1 व सन्मानचिन्ह,द्वितीय क्रमांकास रोख रु.3 हजार 1 व सन्मानचिन्ह ,तृतीय क्रमांकास रोख रु. 1 हजार 501 व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांकास रोख रु. 701 व सन्मानचिन्ह तसेच उत्तेजनार्थ म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.तर वैयक्तिक नृत्य स्पर्धेतील प्रथम क्रमांकास रोख रु.2 हजार 1 व सन्मानचिन्ह,द्वितीय क्रमांकास रोख रु.1 हजार 501 व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकास रोख रु. 1 हजार 1 व सन्मानचिन्ह,चतुर्थ क्रमांकास रोख रु. 501 व सन्मान चिन्ह तसेच उत्तेजनार्थ म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.समुह नृत्य स्पर्धेसाठी 300 रु. तर वैयक्तिक नृत्य स्पर्धेसाठी 100 रु प्रवेश शुल्क असणार आहे.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अंतिम दि.1 मार्च असून अधिक माहितीसाठी आशिष कारेकर 9422505613/अमित पोफळे 9527314696 यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.