खेड लिओ क्लब अध्यक्षपदी डॉ. वेद तलाठी

खेड(प्रतिनिधी) खेड लायन्स क्लब ऑफ सिटी अंतर्गत लिओ क्लबची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी डॉ. वेद तलाठी तर सचिवपदी यश बुटाला यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

दस्तुरी येथील हॉटेल दिप्ती येथे झालेल्या बैठकीत लायन्स क्लबचे विभागीय चेअरमन मनोज जैन व माजी चेअरमन आशिष मेहता यांच्या उपस्थितीत नवी कार्यकारिणी जाहीर झाली. खजिनदारपदी सारा गांधी, उपाध्यक्षपदी ऐश्वर्या मोरे यांची निवड झाली. नूतन पदाधिकाऱ्यांना शपथ देण्यात आली. १५ सदस्यांना सभासदत्वही देण्यात आले.

याप्रसंगी लायन्स क्लब ऑफ सिटीचे अध्यक्ष रोहन विचारे, डॉ. विक्रांत पाटील, पंकज शहा, राजेश जोयसर, मिलींद तलाठी, राकेश जैन, शैलेश धारिया, निनाद गांधी, संतोष शिंदे, विवेक कदम, नईम चौगुले, डॉ. शिवाजी दुबे, मानिक लोहार उपस्थित होते. सूत्रसंचालन खजिनदार अनिल मोरे यांनी केले.