रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती विजय सालीम यांचे मंगळवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने खेड येथे आकस्मिक निधन झाले.
समाजाभिमुख कामे तळमळीने करणारा कार्यकर्ता, पंचायत समिती सदस्य व उपसभापती पदापासून जिल्हा परिषद सदस्य व शिक्षण सभापती पर्यंत त्यांनी झेप घेतली. कुणबी समाजाचा नेता अशी त्यांची जरी ओळख असली तरी समाजासाठी कामे करताना अथवा पक्षाचे काम करताना त्यांनी कोणतेही जातीपातीचे राजकारण केले नाही. निवळी येथील पंचतारांकित एमआयडीसीच्या आंदोलनामध्ये स्वर्गीय तात्या अभ्यंकर ,काकासाहेब मुळे व विजय सालीम हे अग्रेसर पणे कार्यरत होते
विजय सालीम खेड येथे असताना त्यांचे दुर्दैवी निधन झाले. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत त्यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी मिऱ्या येथे आणण्यात येणार आहे. तर आज रात्री दहा वाजता अलावा, जकिमिर्या येथील त्यांच्या निवास स्थाना पासून अंत्ययात्रा निघणार आहे. भाजपासह अनेक राजकीय नेते पदाधिकारी यांनी विजय सालीम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.











