को रे मार्गावर आज अडीच तासांचा मेगाब्लॉक

खेड(प्रतिनिधी)कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी- वैभववाडी विभागादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामासाठी अडीच तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ८.३० वाजता सुरू होणारा मेगाब्लॉक सकाळी ११ वाजता संपेल. या मेगाब्लॉकमुळे ३ रेल्वेगाड्यांच्या सेवांवर परिणाम होणार असल्याने अन्य रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे.

१६३४६ क्रमांकाची तिरुवअनंतपूरम-लोकमान्य टिळक नेत्रावती एक्सप्रेस ३० नोव्हेंबर रोजी उडुपी-कणकवली विभागादरम्यान २ तास ३० मिनिटे थांबवण्यात येईल. १०१०६ क्रमांकाची सावंतवाडी- दिवा एक्सप्रेस १ डिसेंबर रोजी सावंतवाडी- कणकवली विभागादरम्यान ३० मिनिटे थांबवण्यात येणार आहे. १२०५१ क्रमांकाची सीएसएमटी मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस डिसेंबर रोजी’ रत्नागिरी स्थानकात स्थानकात १० मिनिटे थांबवण्यात येईल.