चौके येथील दोन अंगणवाडी इमारतींचा भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत शुभारंभ 

चौके कुळकरवाडी-चौके हरिजनवाडी या इमारतीसाठी बावीस लाख पन्नास हजारांचा निधी मंजूर 

चौके | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील चौके-कुळकरवाडी आणि चौके हरिजनवाडी या दोन अंगणवाडीच्या नूतन इमारत बांधकामासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रत्येकी 11 लाख 25 हजार असे एकूण 22 लाख 50 हजार निधी भाजप नेते निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शासनाच्या माध्यमातून मंजूर केला आहे.

 

चौके – कुळकरवाडी तसेच चौके हरिजनवाडी येथील नूतन अंगणवाडी बांधकामचा शुभारंभ भाजपा नेते निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी संपन्न झाला.

 

यावेळी चौके माजी सरपंच राजन गावडे, सुरेश चौकेकर, सदाशिव गावडे गुरुजी, राघो गावडे, सचिन आंबेरकर, मनीषा वराडकर, अक्षता गायकवाड, दिगंबर गावडे, उदय गावडे सूर्यकांत गावडे, प्रभाकर गावडे, मंगेश पात्रे, अजित गावडे, निहाल गोवेकर, अंगणवाडी सेविका कल्याणी परब, भारती सुकळी यांच्यासह ग्रामस्त भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी भाजपा नेते निलेश राणे यांचे आभार मानले.