अशोक पोंक्षे यांची माखजन हायस्कूल ला कलादालना साठी देणगी

२३ मार्च ला होणार उदघाट्न सोहळा

माखजन |वार्ताहर :     संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल माखजन साठी आंबवं पोंक्षे गावचे सुपुत्र,जेष्ठ रंगाकर्मी,श्री सूर्यनारायण संस्था आंबव पोंक्षे चे अध्यक्ष श्री अशोक पोंक्षे यांनी कलादालना साठी ३ लाख इतकी भरघोस देणगी दिली आहे.

या देणगी तून अद्ययावत अशा कलादालनाची निर्मिती होणार आहे.या कलादालनाचे उदघाटन २३ मार्च रोजी सकाळी १० वाजता संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आनंद साठे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.यावेळी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.