पुरोगामी कलगी तुरा उन्नती मंडळाचा उपक्रम
चिपळूण (वार्ताहर) : पुरोगामी कलगीतुरा उन्नती मंडळ चिपळूण यांच्या वतीने सोमवार दिनांक ११ रोजी शक्ती तुरा सामन्याचे आयोजन इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे रात्री ९ वाजता करण्यात आले आहे. दोन नामवंत शाहिरांचा मुकाबला या ठिकाणी होणार आहे.
पुरोगामी कलगीतुरा उन्नती मंडळ चिपळूण हे समानतेचा उद्देश घेऊन चालणारे आणि पुरोगामी विचार जपणारे मंडळ आहे. लोककला संवर्धन आणि प्रसार व प्रचार करण्यासाठी पुरोगामी कलगीतुरा उन्नती मंडळ नेहमीच अग्रेसर असते. याच मंडळांनी रसिकांच्या मनोरंजनासाठी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे शक्ती तुरा सामना आयोजित केला आहे. प्रसिद्ध शक्तीवाले शाहीर परशुराम फागे सह दीपक कांबळी आणि डबल मिनिंगचा बादशहा अशी ओळख असणारे नामवंत तुरेवाले शाहीर रत्नाकर महाकाळ यांचा जंगी सामना होणार आहे. यासाठी १५० रुपये व १०० रुपये तिकीट दर आकारलेला आहे. चिपळूण येथे. खुप वर्षांनी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात शक्ती तुरा सामना रंगणार आहे. त्यामुळे निश्चितच रसिकांची गर्दी होईल . या शक्ती तुरा सामन्याचा आस्वाद रसिक प्रेक्षकांनी घ्यावा असे आवाहन पुरोगामी कलगीतुरा उन्नती मंडळाचे अध्यक्ष महादेव नाचरे यांनी केले आहे.










