चिपळूण मध्ये मानवाधिकार विषयी कार्यशाळा संपन्न

गुहागर | प्रतिनिधी : चिपळूण येथे मानवाधिकार ( हयुमन राईट ) या विषयीची कार्यशाळा ऑडव्होकेट श्री. अनिल म्हाळसकर यांच्या मार्गदर्शनने नुकतीच संपन्न झाली. उपस्थित मान्यवरांचे संजय भागवत, यांनी शाब्दिक स्वागत करून. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मानव संसाधन विकास संस्थाचे राष्ट्रीय चेअरमन मा.अॅडव्होकेट श्री. अनिल म्हाळसकर सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्य शाळेला सुरवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले. कार्यशाळे मध्ये मानवाधिकार, त्याची सुरवात, मानवाधिकाराचे होणारे उल्लंघन, मानवाचे हक्क कोणते याबाबत मोजक्या शब्दांत व सोप्या पद्धतीने मार्गदर्शन अॅ. श्री. अनिल म्हाळसकर सर यांनी केले.

यानंतर जिल्हा सदस्य व पदाधिकारी यांना ओळखपत्र व प्रमाणपत्र सरांच्या हस्ते देण्यात आले.

त्यावेळी मानव संसाधन विकास संस्था सक्रिय कार्यकारिणी महाराष्ट्र चे जन संपर्क अधिकारी श्री. भिमराव सुतार व श्री.गंगाधर साहेब , रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष श्री मोहन धनावडे उपस्थित होते. नव्याने नियुक्त रत्नागिरी जिल्हा सचिव संजय भागवत, रत्नागिरी जिल्हा जन संपर्क अधिकारी सौ.रेशमा तांबे. गुहागर तालुका अध्यक्ष श्री संतोष घुमे,सचिव श्री. प्रभाकर धावडे, प्रकाश धनावडे, सदस्य श्री सिद्धेश मोरे व श्री. गोणबरे सौ.स्वाती टेमकर चिपलूण चे उपाध्यक्ष श्री. मिलिंद सावंत,जन संपर्क अधिकारी. श्री. कृष्णाजी कोकमकर, सौ.रेवती साळवी,

गुहागर, चिपलूण, खेड, रत्नागिरी व मुंबईत मधून 20 लोकांनी कार्यशाळेत सहभागी होऊन मानवाधिकाराचे महत्व समजून घेतले. व लवकरच चिपलूण येथे जिल्हा कार्यालय सुरू होत असून गुहागर तालुका जन संपर्क कार्यालय सुरू करण्यात आल्याची माहिती देवून उपस्थितांचे आभार मानून कार्यशाळेचा समारोप श्री. संजय भागवत ,रत्नागिरी जिल्हा सचिव यांनी केला.